● समानतेसाठी संघर्ष वाढवा – कॉ. शंकरराव दानव ● वणीत श्रमिक महिला मेळावा संपन्न ● जागतिक महिला दिन व… ● क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिनाचे औचित्य |
वणी : राजू निमसटकर
भांडवलदारांची कर्जे माफ करून त्यांना लुटीची मोकळीक उपलब्ध करून देणारे सरकार मात्र, जनतेच्या प्राथमिक आरोग्यासाठी कार्य करणाऱ्या आशा वर्कर यांना वेतन न देता तुटपुंजे मानधन देऊन फसवीत आहे. ही सरकार साठी खूप मोठी लाजिरवानी बाब आहे. पण आशा व गटप्रवर्तकांनी सिटू संघटनेच्या माध्यमातून संघर्ष करून आपले अधिकार मिळवून घ्यावे. असे आवाहन, आशा व गटप्रवर्तक कर्मचारी फेडरेशन – सिटूच्या राज्य अध्यक्ष कॉ. आनंदीताई अवघडे यांनी श्रमिक महिला मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना केले. यावेळी कॉ. शंकरराव दानव, कॉ. कुमार मोहरमपुरी व कॉ. ऍड. दिलीप परचाके यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृती दिनाचे औचित्य साधून वणी येथे सिटू आशा संघटना, जनवादी माहिला संघटना व किसान सभेच्या संयुक्त विद्यमाने श्रमिक महिला मेळाव्याचे आयोजन १३ मार्च ला करण्यात आले होते.
कॉ. शंकरराव दानव यांचे अध्यक्षतेखाली नामवंत शिक्षिका तथा कवयित्री रजनीताई पोयाम यांचे हस्ते श्रमिक महिला मेळाव्याचा उदघाटक सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सिटू संघटनेच्या राज्य अध्यक्षा कॉ. आनंदीताई अवघडे, माकप चे जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी, किसान सभेचे राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ. ऍड. दिलीप परचाके तर प्रमुख पाहुण्या म्हणून आशा युनियन च्या जिल्हा सचिव कॉ. उषाताई मुरखे, कलावती दानव प्रामुख्याने उपस्थित होत्या.
विशेष म्हणजे आयोजित श्रमिक महिला मेळाव्यात वणी येथील कु. तनुजा राजू गव्हाणे हिने महिलांच्या स्व:रक्षणसाठी लाठी-काठी व तलवारबाजी ह्या कलाकौशल्याचे सादरीकरण केले. व स्व:रक्षणाचा महिलांना गुरु मंत्र दिला. यावेळी तनुजा गव्हाणे हिचा भेटवस्तू देऊन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
श्रमिक महिला मेळाव्याची प्रस्तावना प्रतिभाताई लांजेवार तर संचालन कॉ. प्रीती करमनकर यांनी केले. मेळाव्याचे यशस्वीतेसाठी मेघा बांडे, किरण बोनसुले, शिला नळे, सोनाली निमसटकर, गीता भालेराव, रिजवाना शेख, शुभांगी नागपुरे, अश्विनी पोहेकर, वंदना ठाकरे, वर्षा गोवरदीपे, योगिता कुनघाटकर, कल्पना मजगवळी, ताई डोंगरे, सीमा मून, चंदा पथाडे, भावना मेश्राम, कुंदा देहारकर, चंदा मडावी, माधुरी कांबळे, कविता कुबडे, अलका बोरपे, प्रतिभा बाराहाते, ज्योती मालेकर, माधुरी मडावी, अर्चना थेरे, नालाभिताई, वंदना भगत, छाया पिदूरकर, रंजना डांगे, पाळावेकर ताई, कडुकर ताई, वंदना गेडाम, वैभव मजगवळी, नंदकिशोर बोबडे, कवडू चांदेकर आदींनी परिश्रम घेतले.
देशात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाची दारे मोकळी केल्यामुळेच आज महिला प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व गाजवीत आहेत. पण आजही भारतातील श्रमिक महिला मग त्या कारखान्यात असोत वा शेतात, वा असंघटित क्षेत्रात काम करणारी असोत. यांना जो पर्यंत समान कामाला समान वेतन मिळत नाही, तोपर्यंत देशात समानता आली असे म्हणता येणार नाही. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने आर्थिक समानता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करीत असताना महिलांनी समानतेचे विचार आत्मसात केले पाहिजे. कॉ. शंकरराव दानव |