● प्रेषित मोहम्मद जयंती दिनाचे औचित्य ● 196 रक्तदात्यांनी केले रक्तदान ● पस्तीस महिलांचा विशेष सहभाग |
वणी :- राजू निमसटकर
प्रेषित मोहम्मद यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत, जमात-ए-इस्लामी हिंद वणी शाखेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराची परंपरा कायम राखली आहे. विशेष म्हणजे यावर्षीच्या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग होता हे विशेष. जमात-ए-इस्लामी हिंद यवतमाळ जिल्हा अध्यक्ष आरिफ खान यांच्या अध्यक्षतेखाली वणी शहराचे टिळक चौक येथे पार पडलेल्या रक्तदान शिबिराचे प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किन्द्रे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती, तर वणी पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी, तसेच वाहतूक शाखा निरीक्षक सीता वाघमारे यांचीही आयोजित रक्तदान शिबिराला प्रामुख्याने उपस्थिती होती.
धर्म भेद व जातीय भेद बाजूला सारत एकतेचे दर्शन घडविणाऱ्या रक्तदान शिबिरात एकूण १९६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे यात ३५ महिलांचा आयोजित रक्तदान शिबिरात उल्लेखनीय सहभाग होता हे विशेष. प्रेषित मोहम्मद यांच्या जयंतीचे औचित्य साधत रक्तदान शिबिराचे दरवर्षी आयोजन केले जाते. मागील दहा वर्षांपासून सुरु असलेल्या या उपक्रमाला वणीकरांनी जातिभेद व धर्मभेद विसरून एकतेचे दर्शन घडवले, हे विशेष.
आयोजित यशस्वी रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचे संचालन आरिफ सर यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ. सय्यद अतीक यांनी केले. आभार प्रदर्शन ज़िया अहमद यांनी केले. रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी हाफिज सलीम अंसारी, मुश्ताक भाई, सालिस शेख, निसार मिस्त्री, शकील शेख, ज़मीर शेख, सलीम शेख, सादिक शेख, नाहिद अंसारी, आरिफ सर, अब्दुल कय्यूम, सय्यद यूनुस, चेतन नगरळे आणि इतरांनी अथक परिश्रम घेतले.
Very nice, keep it up.