पोलीस भरती ही केवळ नोकरी नसून समाजसेवेची जबाबदारी -डॉ. नीरज वाघमारे


यवतमाळ :- वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हाध्यक्ष तसेच यवतमाळ नगरपालिकेचे नगरसेवक, तथा गटनेते डॉ.नीरज वाघमारे यांच्या पुढाकाराने पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन शनिवार, दिनांक १७ जानेवारी रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता डॉ.नंदुरकर विद्यालय, दारव्हा रोड, यवतमाळ येथे करण्यात आले.
आयोजित उपक्रमशील मार्गदर्शन मेळाव्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ.नीरज वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की,“पोलीस भरती ही केवळ नोकरी नसून समाजसेवेची जबाबदारी आहे. ग्रामीण व वंचित घटकातील तरुणांनी योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिस्तबद्ध तयारीच्या जोरावर यश संपादन करावे. युवकांच्या भविष्यनिर्मितीसाठी असे उपक्रम सातत्याने राबविणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे.” त्यांच्या या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला.

या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.विठ्ठल कांगणे सर यांनी पोलीस भरतीच्या संपूर्ण प्रक्रियेवर सखोल आणि व्यावहारिक मार्गदर्शन केले. त्यांनी लेखी परीक्षा, शारीरिक चाचण्या, अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन तसेच मानसिक तयारी या सर्व बाबींवर सविस्तर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी कोणत्या चुका टाळाव्यात, सराव कसा करावा आणि सातत्य कसे राखावे, याबाबत त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवाधिष्ठित मार्गदर्शनामुळे उपस्थित विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या तयारीसाठी स्पष्ट दिशा मिळाली.

या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ शहरातील विविध अकादमींचे प्राध्यापक मंडळी उपस्थित होती. त्यामध्ये गजानन माळोदे, उमेश नगराळे, मनीश बुटले, सतीश आडे, प्रीतम माकोडे, नितेश मेश्राम, जगदीश वानखेडे, प्रमोद डेरे, नितीन आडे, निलेश उईके, केतकी पोटे आदींचा समावेश होता.

युवकांसाठी अत्यंत अभ्यासपूर्ण अशा मार्गदर्शक सोहळ्याला, वंचित बहुजन आघाडीच्या निर्वाचित नगरसेवकांमध्ये मीराताई वीर, संघपाल कांबळे, पायल कांबळे उपस्थित होते. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुष्पा सिरसाट, प्रमोद पाटील, करुणा मून, सुकेशनी खोब्रागडे, विलास वाघमारे, इंजि. अशोक कयापाक, संजीव कुमार इंगळे, करुणा चौधरी, सविता तिडके आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रमाचे संचालन इंजि.अशोक कयापाक यांनी केले तर आभार प्रदर्शन संघपाल कांबळे यांनी मानले. हा मार्गदर्शन मेळावा युवकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून डॉ.नीरज वाघमारे यांच्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment