मारेगांवात ‘वंचित’ची तहसीलवर धडक…!


मारेगांव (प्रतिनिधी) :

​वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे पुकारण्यात आलेल्या ‘मोदी हटाव, देश बचाव’ जनआंदोलनाच्या समर्थनार्थ २ मार्च रोज सोमवारला मारेगांव तहसील कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगांवचे वतीने धडक देण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांचे मार्फत भारत सरकारला निषेध निवेदन सादर करण्यात आले.

“केंद्र सरकारने अमेरिकेसोबत केलेले छुपे व्यापार करार आणि संरक्षण क्षेत्रातील तडजोडींमुळे भारताचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. शेती आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावून भांडवलदारांचे हित जोपासणाऱ्या मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आता पर्याय नाही,” अशा घणाघाती शब्दांत यावेळी राजू निमसटकर यांनी केंद्र सरकारवर प्रहार केला. यावेळी पुढे बोलताना राजू निमसटकर म्हणाले की, “पंतप्रधानांनी अमेरिकेच्या दबावाखाली येऊन जे करार केले आहेत, त्यातून अमेरिकन स्वस्त सोयाबीन, मका आणि लाल ज्वारी भारतात आणली जाणार आहे. यामुळे आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या मालाचे भाव कोसळतील. राफेल खरेदीतील अपारदर्शकता आणि जागतिक ‘एपस्टिन’ फाईल्समध्ये भारतीय नेतृत्वाचे नाव येणे ही देशासाठी अत्यंत लज्जास्पद बाब आहे. हे सरकार केवळ इव्हेंटबाजी करण्यात मग्न असून देशाच्या प्रतिमेची आणि सुरक्षेची त्यांना पर्वा नाही.” अशी खंत व्यक्त करीत सरकारच्या या जनता विरोधी धोरणाचा राजू निमसटकर यांनी जाहीर निषेध केला.

या आंदोलनात मारेगाव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व स्तरिय पदाधिकारी आणि महिला आघाडीची उपस्थिती लक्षणीय होती. “देशाचे संविधान आणि शेतकऱ्यांचे भविष्य वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत,” अशा भावना महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मारेगांव तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मुन, कार्याध्यक्ष अनिल खैरे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर देठे, मारेगांव शहर अध्यक्ष अनंता खाडे, मारेगांव शहर कार्याध्यक्ष रवींद्र तेलंग, तालुका महासचिव विपल्व ताकसांडे, शहर महासचिव विनेश मेश्राम, तालुका उपाध्यक्ष रवी वनकर, शहर उपाध्यक्ष बालू गजभिये, अभिषा निमसटकर, यशोधरा लिहीतकर, मंजुषा काटकर, मेघा भगत, किरणताई लढे, कविताताई ताकसांडे, वैशाली गोवर्धन, प्राणशील पाटील, लक्ष्मीकांत तेलंग, अविनाश सातपुते, यशवंत पाटील, दशरथ देवाळकर, भारत आत्राम, योगेश कुमार पाटील, कैलास खाडे, अमरनाथ तेलतुंबळे, रमेश ताकसांडे, यशवंत भरणे, अनिल महाकुलकर यांचेसह वंचित बहुजन आघाडीच्या सर्व सेलचे पदाधिकारी, महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment