विशेष प्रतिनिधी :- अत्यंत विषम परिस्थितीत जन्माला आलेले आणि आंबेडकरी चळवळीतील सच्चे सेवक म्हणून ओळखले जाणारे आयुष्यमान मंगल तेलंग हे व्यक्तिमत्त्व म्हणजे संघर्ष, निष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण आहे.
विद्यार्थीदशेपासूनच समाजकार्याची जाण जपत त्यांनी आपल्या सामाजिक व राजकीय प्रवासाची सुरुवात आंबेडकरी चळवळीतून केली.
विद्यार्थीदशेतच त्यांनी आंबेडकरी आंदोलनात अत्यंत सक्रिय सहभाग घेतला. बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे या ऐतिहासिक आंदोलनात त्यांचा सक्रिय व ठळक सहभाग राहिला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (जोगेंद्र कवाडे गट) मध्ये त्यांनी सक्षम नेतृत्व करत कार्याची भक्कम पायाभरणी केली.
यानंतर आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या “भारिप” पक्षात सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांनी दमदार सुरुवात केली. वणी विधानसभा मतदारसंघातील गावागावात कार्यकर्त्यांची फळी उभी करून चळवळीला बळकटी देण्याचे कार्य त्यांनी निष्ठेने केले.

जाती-पाती, धर्म यांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थी, शेतकरी, कामगार, व्यापारी अशा सर्व घटकांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला आणि आजही करत आहेत.
वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचित घटकांपर्यंत पक्षाची ताकद पोहोचविण्याचे त्यांचे कार्य लक्षात घेऊन त्यांची जिल्हा उपाध्यक्ष (यवतमाळ) म्हणून नियुक्ती झाली, हे त्यांच्या कार्याचे मोठे कौतुक आहे.
गेल्या तीन दशकांपासून सिद्धार्थ वस्तीगृह, वणी येथे अधीक्षक म्हणून कार्य करत, विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी ते अखंड झटत आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे.
आज ५५ वर्षांचा जीवनप्रवास पूर्ण करत असताना, आंबेडकरी विचारांशी कायम निष्ठा राखत त्यांनी समाजात सन्मानाचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या साधेपणामुळे, कार्यामुळे आणि मैत्रीभावामुळे सर्व स्तरातील लोक त्यांचा आदर करतात.

बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य ते अविरतपणे करत आहेत, म्हणूनच आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.
अशा माझ्या जिवलग मित्रास, क्रांतिकारी मानाचा जय भीम आणि जन्मदिवसाच्या कोटी कोटी मंगलमय शुभेच्छा…!
शुभेच्छुक
राजू निमसटकर
जिल्हा उपाध्यक्ष, तथा वणी विधानसभा प्रमुख
वंचित बहुजन आघाडी, यवतमाळ






