| • ध्येयवादाचं धगधगत नेतृत्व • धम्मविचारांचा प्रवाही वारसा |
विशेष प्रतिनिधी : काही माणसे इतिहासाच्या पानात केवळ नाव कोरत नाहीत, तर ते स्वतः एक इतिहास घडवतात. संघर्षाच्या मुशीतून तावून-सुलाखून निघालेले, शिस्तीचे कडक आचरण असणारे आणि अंतःकरणात समाजाविषयी अपार करुणा बाळगणारे नाव म्हणजेच आदरणीय मिलिंदजी पाटील. समाजात अशी काही व्यक्तिमत्त्वे असतात, जी केवळ नावाने ओळखली जात नाहीत, तर त्यांच्या स्वभावातील औदार्यामुळे त्यांना लोकमान्य पदव्या मिळतात. आदरणीय मिलिंदजी पाटील हे असेच एक व्यक्तिमत्व. जगासाठी ते ‘मिलिंद’ असतील, पण वणी – मारेगांव – झरी तालुक्यातील तमाम जनतेसाठी ते ‘राजे’ आहेत. नावाने ‘मिलिंद’, आणी ‘मिलिंद’ या नावाचा अर्थ होतो फुलांमधील मध शोधणारा भ्रमर. भ्रमर ज्याप्रमाणे चांगल्या गोष्टींचा संग्रह करतो, तसाच मिलिंदजींनी आयुष्यभर चांगल्या विचारांचा आणि माणसांचा संग्रह केला. म्हणूनचं लोक त्यांना आदराने ‘राजे’ म्हणतात, आणि हे संबोधन त्यांनी वारशाने नाही, तर आपल्या ‘मनाच्या श्रीमंतीने’ कमावले आहे. आजच्या विषम परिस्थितीत, जिथे माणूस माणसाला विसरत चालला आहे, तिथे मिलिंदजींनी आपल्या दातृत्वाने आणि प्रेमळ स्वभावाने लोकांच्या हृदयावर आणी मनावर आपले साम्राज्य निर्माण केले आहे. ते खऱ्या अर्थाने ‘मनाचे श्रीमंत राजे’ आहेत.

आज त्यांचा वाढदिवस. मिलिंद जी (राजे) पाटील यांचा वाढदिवस साजरा करणे म्हणजेच एका अशा नेतृत्वाचा गौरव करण्याचा दिवस, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य ”बहुजन हिताय, बहुजन सुखाय” या तत्त्वासाठी अर्पण केले आहे.
मिलिंदजींचा जीवनप्रवास हा एखाद्या प्रेरणादायी ग्रंथासारखा आहे. वणी तालुक्याच्या अडेगांव या लहानश्या गावच्या मातीत जन्मलेल्या आणि एका शिक्षक पित्याचे संस्कार घेऊन वाढलेल्या मिलिंदजींनी तारुण्यातच देशाच्या सीमेवर CRPF मध्ये सेवा बजावली. सात-साडेसात वर्षे फौजी म्हणून शत्रूशी दोन हात केल्यानंतर, त्यांच्यातील समाजसेवकाने त्यांना साद घातली. देशाची सीमा सुरक्षित करण्यासोबतच समाजाची मूल्ये सुरक्षित करणे अधिक महत्त्वाचे आहे, हे ओळखून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि समाजकारणाच्या रणभूमीवर पाऊल ठेवले.

एका बाजूला CRPF मधील फौजी शिस्त आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक समतेसाठीच्या धगधगत्या संघर्षामुळेच मिलिंदजींनी केवळ सत्ता किंवा पदासाठी काम केले नाही. तर २००६ ची ऐतिहासिक धम्म परिषद असो वा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उभारलेले मोर्चे, त्यांच्या प्रत्येक कृतीत एक ‘राजेशाही’ करारीपणा दिसतो. अन्याय दिसला की एखाद्या राजासारखे धावून जाणे आणि वंचितांना न्याय मिळवून देणे, हा त्यांचा स्वभावधर्म आहे. धम्म आणि समाजकारणाचा सुवर्णसंगम साधत त्यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून जे कार्य उभे केले, त्यातून केवळ कार्यकर्त्यांची फळीच निर्माण झाली नाही, तर अनेक निष्ठावंत महिला भगिनींना समाजात सन्मानाचे स्थान मिळाले.

यवतमाळ जिल्ह्याच्या वणी आणि परिसरातील भारतीय बौद्ध महासभेचे कार्य आज ज्या उंचीवर आहे, त्याचा खंभा मिलिंदजी पाटील हेच आहेत. स्वतः श्रामनेर शिबीर करून धम्माचे संस्कार अंगी बाळगणाऱ्या या राजाने वणीमध्ये धम्मचक्राला नवी गती दिली. आदरणीय मीराताई आंबेडकरांच्या उपस्थितीत झालेली धम्म परिषद ही त्यांच्या संघटन कौशल्याची आणि ‘राजवैभवी’ विचारांची साक्ष देते. मिलिंदजींनी आपल्या संघटन कौशल्याने धम्मकार्याला एक नवी दिशा देत असतानाच केवळ उत्सव साजरे न करता, त्यांनी ‘प्रशिक्षित उपासक’ तयार करण्यावर भर दिला. बाल श्रामनेर शिबिरे आणि धम्म प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी पिढ्यानपिढ्यांमध्ये वैचारिक पेरणी केली. त्यांच्या कार्यकाळात अनेक निष्ठावंत महिला कार्यकर्त्या घडल्या, जे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे.

राजकीय आणि सामाजिक लढयातील वंचितांच्या बुलंद आवाजाचे
राजकारण हे मिलिंदजींसाठी सत्ता मिळवण्याचे साधन नसून, समाजपरिवर्तनाचे माध्यम राहिले आहे. पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी गावगाड्याचे अनेक प्रश्न तडीस नेताना शोषित पिढीतांच्या न्यायासाठीचे अनेक संघर्ष आजही लोक विसरले नाहीत. म्हणूनचं, आज वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव म्हणून ते संपूर्ण जिल्ह्याचा आवाज बनले आहेत. अन्यायग्रस्त शेतकरी असो, उपेक्षित समाज घटक असो वा शैक्षणिक प्रश्न, मिलिंदजींचा शब्द आणि त्यांची उपस्थिती समोरच्याला न्यायाची खात्री देते. शेकडो मोर्चे आणि आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी सत्तेला नेहमीच जनसामान्यांच्या हितासाठी झुकवीले आहे.

मिलिंदजींच्या अलौकिक व्यक्तिमत्वात फौजी शिस्त आणि धम्मप्रचारकाची विनम्रता यांचा सुवर्णसंगम आहे. त्यांचे वक्तृत्व धारदार असले तरी त्यांचे मन तितकेच हळवे आहे. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी तरुणांना नेहमीच उच्च ध्येयांचे स्वप्न पाहण्यास प्रवृत्त केले आहे. त्यांचे कार्य हे केवळ एका क्षेत्रापुरते मर्यादित नसून ते राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक अशा चतु:सूत्रीवर आधारित आहे.
”वादळांना अंगावर झेलत,ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्या पथिकाला थकवा माहीत नसतो.” मिलिंदजी हे असेच एक पथिक आहेत, ज्यांनी स्वतःला समाजाच्या कल्याणासाठी वाहून घेतले आहे.

आज १६ मे, मिलिंदजी (राजे) पाटलांचा
आज “वाढदिवस” अशा या, ‘मनाने श्रीमंत’ असणाऱ्या आपल्या राजाला, संघर्षाच्या मुशीतून उभे राहिलेल्या आपल्या नेतृत्वाला, जे स्वभावानेही ‘राजे’ चं आहेत. या लोकनेत्याला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तथागत चरणी मंगल कामना करतो. त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि त्यांच्या विधायक कार्यात अधिकाधिक यश लाभो. त्यांच्या विचारांची ही मशाल अशीच प्रकाशमान राहो आणि त्यांच्या हातून सामाजिक समतेचे कार्य अविरत घडत राहो.
आदरणीय मिलिंदजी पाटील, (राजे) आपणास आपल्या “सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या” आम्हा सर्वांकडून कोटी कोटी मंगलमय शुभेच्छा…!







