हैदोस प्राण्यांचा अन गोंधळ प्रशासनाचा…!


अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकरी बळीराजाच्या जगण्याच्या ह्याचं व्यथा कमी आहेत की काय म्हणून, अगदी कष्टाने उभं केलेल्या पिकाचा फडशा पाडण्यासाठी वन्य प्राण्यांनी सार्वत्रिक हैदोस मांडलाय. आणी तिकडे, गोंधळलेल्या प्रशासनाने नुकसान ग्रस्त शेतकरी बळीराजाला नेहमीप्रमाने लाभापासून वंचित ठेवत, पुन्हा एकदा त्यांच्या जखमेवर मीठ चोळले. मात्र, इथे हतबल बळीराजा शेतकरी आपल्या “हक्काचा माणूस” असलेल्या समाजसेवी संजय खाडे यांच्या नेतृत्वात न्यायासाठी एकवटलायं आणी प्रशासनाची इकडे पुन्हा एकदा धांदल उडाली.

वणी तालु्क्यातील शेकडो शेतक-यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांनी नुकसान केले आहे. गोंधळलेल्या शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचा पंचनामा केला. मात्र अद्यापही साडे सातशे पेक्षा अधिक शेतक-यांना नुकसान भरपाई मिळालेलीचं नाही. अखेर त्रस्त झालेल्या संतप्त शेतक-यांनी आपल्या “हक्काचा माणूस” असलेले काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांची भेट घेत त्यांचे समोर आपल्या समस्येचे गाऱ्हाणे मांडलेत. बळीराजा शेतकऱ्यावरती झालेल्या अन्यायाची संजय खाडे यांचे कडून तात्काळ दखल घेतल्या गेली व लगेच मंगळवार दिनांक 10 सप्टेंबरला वणी वन विभागाला निवेदन देण्यात आले. यावेळी 15 दिवसाचे आत प्रशासनाने दखल घेतली नाही तर, वणी वनविभाग कार्यालया समोर शेतक-यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन केले जाईल, असा गंभीर इशारा संजय खाडे यांनी वन विभाग प्रशासनाला दिला.

बळीराजा लाभापासून वंचित…

वणी तालुक्यात वर्ष 2023-24 या काळात 996 शेतक-यांच्या शेतात वन्य प्राण्यांनी अतोनात नुकसान केले. या नुकसानीचा वनविभागातर्फे पंचनामा सुद्धा झाला. मात्र आतापर्यंत केवळ 240 लाभार्थ्यांनाचं नुकसान भरपाई मिळाली आहे. तर उर्वरीत 756 शेतकरी लाभापासून वंचित आहे. लाभापासून वंचित असलेल्या शेतक-यांचा आकडा मोठा आहे. यासाठी 20 लाखांचा निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment