आज वंचितच्या उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखती…!


राज्य निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणुकीचा बिगुल वाजवेल हे सांगता येत नाही. म्हणूनच, सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्ष देखील आपापल्या परीने विधानसभा निवडणुकीच्या जय्यत तयारीला लागल्याचे चित्र सध्या तरी संपूर्ण राज्यभर दिसते आहे. वंचित बहुजन आघाडीने देखील एकला चलो रे ची भूमिका स्पष्ट करत, राज्यभर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत निवडणुकीच्या मैदानात दमदार एंट्री केली आहे. याचाच एक भाग यवतमाळ जिल्ह्यातील विविध विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती वंचित बहुजन आघाडीच्या
निवडणूक समन्वय समितीच्या सदस्य असलेल्या दिशाताई पिंकी शेख यांच्या विशेष उपस्थितीत पार पडणार आहेत.

विशेष म्हणजे सत्तेच्या लालसेपोटी युती आघाड्यांच्या जुगाडात राज्यातील जवळपास सर्वच पक्ष दिसत असतानांच, न्याय हक्कासह स्वाभिमानाची लढाई लढत असलेले वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वां श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी “एकला चलो रे” चा नरा देत राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून टाकली आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणुकीतील भाऊ गर्दीचा गोंधळ टाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या श्रेष्ठ नेतृत्वाने पक्षातील निष्ठावान नेतृत्वाच्या खांद्यावर नियोजनबद्ध कार्यक्रमाची धुरा सोपविली आहे. याचाच एक भाग, वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि विधानसभा निवडणूक समन्वय समितीच्या सदस्य, आदरणीय दिशाताई पिंकी शेख या यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेत निवडणूक लढविणास ईच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती करीता आज यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत.


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment