हाथी घोडा पालखी,जय कन्हैया लालकी.आजपासून वणीत,श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाची धूम…!


हाथी घोडा पालखी,
जय कन्हैया लालकी…! असा जयघोष करीत एकमेकांना शुभेच्छा देत, आजपासून संपूर्ण आठवडाभर श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाची उत्साही धूम वणीकरांसाठी श्रद्धा आणि आनंदाची पर्वनीचं असणार आहे.
ही उत्सवाची परंपरा तितक्याच मोठया आनंदी आणी उत्साही वातावरणात, उत्सव समितीचे अध्यक्ष ऍड. कुणाल विजय चोरडिया यांचे नेतृत्वात संपूर्ण शहरभर मोठया आनंदी, उत्साही वातावरणात साजरी केल्या जाणार आहे. दिनांक २१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट या कालावधीत साजरा होतं असलेल्या श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळयात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यकमांसह विविध स्पर्धा व भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हा संपू्र्ण सोहळा श्री विनायक मंगल कार्यालय गणेशपूर रोड व अमृत भवन येथे होणार आहे. तर या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असलेले लखबिरसिंह लक्खा यांची भजन संध्या शासकीय मैदान येथे होणार आहे.

श्रद्धा परंपरेबरोबरच सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असलेल्या सोहळ्यात, ‘जय बोला प्रिय पत्नीची’ या धमाल विनोदी कौटुंबीक नाटकाने या सोहळ्याची सुरुवात होत आहे. श्री विनायक मंगल कार्यालयात बुधवार दिनांक २१ ऑगस्ट ला सायंकाळी ७ वाजता या नाटकाचा प्रयोग होणार आहे.

गुरुवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदान येथे…
संपूर्ण देशातच नाही तर जगभरात आपल्या जगरात्यासाठी प्रसिद्ध असलेले ‘कि जो केसरी के लाल’ फेम गायक लखबीर सिंह लक्खा यांची भजन संध्या होणार आहे. लखबीर सिंग लाखा हे प्रसिद्ध भारतीय प्रतिभावान भक्ती गायक आहेत, ज्यांनी “अरे द्वारपालो कन्हैया से कह दो” सारखी अनेक गाणी गायली आहेत. लखबीर सिंग लाखा हे अष्टपैलू गायक असून गाणी गात असताना त्याच्या पंजाबी उच्चारणात एक ताजेपणा असतो आणी म्हणूनच ते विशेष पद्धतीने भजने गाण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
त्यांनी गायीलेल्या “प्यारा सजा है तेरा द्वार भवानी” किंवा “ओ द्वारपाल कन्हैया से कहदो” किंवा “श्याम हॅप्पी बर्थडे आपके” किंवा “राम ना मिलेंगे हनुमान के बिना” या सर्व भजनांनी यूट्यूबवर येताच अनेक विक्रम रचले आहेत. ऑडिओच्या जमान्यातही त्यांची भजने सुपर-डुपर हिट ठरली आहेत. त्यांची भजने ऐकल्यावर कोणाचेही मन नक्कीच आनंदित झाल्याशिवाय राहत नाही.

शुक्रवारी दिनांक २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता, श्री विनायक मंगल कार्यालय येथे सुप्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन प्रा. महेंद्र गणपुले यांचा “हास्य नगरी” हा धमाल एकपात्री नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.

शनिवारी दिनांक २४ ऑगस्ट ला सायंकाळी ६ वाजता, श्री विनायक मंगल कार्यालय येथे कौटुंबीक नाटक ”संध्याछाया” या नाटकाचा प्रयोग होणार आहे.

तर रविवारी दिनांक २५ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजता अमृत भवन येथे राज्यातील नामवंत कविंचे कवि संमेलन होणार आहे.

सोमवारी दिनांक २६ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा रंगणार आहे. सकाळी ६ वाजता श्रीकृष्ण पालखी यात्रा निघणार आहे. ही पालखी चोरडिया निवास ते श्रीकृष्ण मंदीर असा प्रवास करणार आहे. संध्या. ६ वा. अमृत भवन येथे सुंदरकाड पाठ व जाप होणार आहे. यात श्रीकृष्ण लीलांचे नाट्य रुपांतरण सादर केले जाणार आहे. रात्री १० वा. अमृत भवन येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा होणार आहे. या जन्मोत्सवात अभिषेक व श्रीकृष्ण श्रुंगार, बालगोपाल दर्शन, मटकी फोड इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी दिनांक २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता, अमृत भवन येथे गोपाळकाल्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर दु. ४ वा. अमृत भवन येथून भव्य शोभायात्रा निघणार आहे. या यात्रेत विविध देखावे व वाद्य वृंद पथक प्रमुख आकर्षण असणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे सचिव उमेश पोद्दार, कार्याध्यक्ष रितेश फेरवाणी, उपाध्यक्ष अनिल रेभे, विशाल दुधबळे, सहसचिव सुरेश मांडवकर, कोषाध्यक्ष- सचिन क्षिरसागर, सहकोषाध्यक्ष – शुभम मदान, प्रसिद्धी प्रमुख – निखिल मार्कडे, सहप्रसिद्धी प्रमुख – हर्ष भारवाणी, सहकार्याध्यक्ष राजु रिंगोले, सहसंयोजक मयुर गोयंका परिश्रम घेत आहे. विजय चोरडिया, विजय पुण्यानी, राजेश बत्रा, संतोष मार्कंडे, आशिष गुप्ता, नारायण गोडे, दिवान फेरवानी, राजाभाऊ बिलोरिया, अरुण कावडकर, गजानन बत्तुलवार यांच्या मार्गदर्शनात जन्मोत्सावाचे नियोजन पूर्ण केले जात आहे.


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment