आरोग्यदायी गावासाठी उपक्रम…!


जलयुक्त, आरोग्यदायी गावासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून “घरकूल तिथे शोषखड्डा” अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याचा निर्धार प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे विजयकुमार सहारे तथा अभिजित जिद्देवार यांच्या विशेष उपस्थितीत तर कोलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच अभिषा राजु निमसटकर यांच्या हस्ते या विशेष अभियानाची सुरुवात मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कोलगावापासून करण्यात आली.

घरकूल तिथे शोषखड्डा या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील सांडपाण्याचे व्यवस्थापन होऊन जलपातळी वाढण्यास मदत होईल. डासमुक्त, रोगमुक्त व जलयुक्त गाव ही संकल्पना यामुळे साध्य होणार आहे. तसेच, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने देखील शोषखड्डयाची कामे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शोषखड्डा कामाचा लाभ घेतल्यास, प्रति शोषखड्डा तीन हजार ३९२ रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या मार्गदर्शनासह पुढकारातून विविध विभागामार्फत होतं असलेल्या घरकुलाच्या कामावर ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या अनुषंगाने उपयोगी असलेल्या शोषखड्याची कामे घेतल्यास ग्रामीण भागातील सांडपाणी व्यवस्थापन, रोगमुक्त व जलयुक्त गाव ही संकल्पना साध्य होऊ शकते. ह्याचं विश्वासातुन दोन ऑक्टोबरपासून घरकुल तिथे शोषखड्डा अभियान संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment