● रक्ताच्या नात्या पलीकडचा भावनिक बंध ● महिलांप्रती पवित्र दृष्टीचा सण ● परंपरेने गाठला दीड तपाचा कालखंड |
वणी : राजू निमसटकर
बहीण-भावांमधील प्रेम वृद्धिंगत करण्याबरोबरच नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे अधिक घट्ट करीत शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन. याच पवित्र सणाच्या महतीला पुढे नेत, समाजाचा महिलांप्रतीचा दृष्टीकोण अधिक पवित्र असावा असा महान संदेश देणार्या भारतीय संस्कृतीच्या या सर्वश्रेष्ठ सणाला, आपण कुटुंबापुरतेच मर्यादित न ठेवता समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज व्यक्त करत, मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी रक्ताच्या नात्यापलीकडचा भावनिक बंध जपणारा रक्षाबंधनाचा सण, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तितक्याच वात्सल्यपूर्ण भावनेतून सपत्नीक मनसे जनसंपर्क कार्यालयात कौटुंबिक वातावरणात साजरा केला.
भाऊ- बहिणीचा हक्काचा सण अशी ओळख असणारा रक्षाबंधनाचा सोहळा यंदा अधिक श्रावणामुळे पुढे ढकलला गेला होता. म्हणूनच श्रावण महिन्यातील पौर्णिमेला अर्थातच नारळी पौर्णिमेला म्हणजेच ३० ऑगस्टला संपूर्ण भारतात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा झाला. याच पवित्र सणाचं पावित्र्य जपत, समाजातील माता-भगिनींना आदरानं वागवलं जावं, तीला समान अधिकार आणि दर्जा दिल्या गेला तरंच, खऱ्या अर्थाने रक्षाबंधन या पवित्र सणाचं महत्त्व राखलं जाईल. ह्या सदहेतूने मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी मागील दीड तपापूर्वी कौटुंबिक परिघाबाहेर जावून रक्षाबंधनाच्या पवित्र सणाला कौटुंबिक वात्सल्याची जोड देत सुरुवात केली. ती आजही अविरत चालू आहे.
भावाच्या सुख, यश आणि आनंदा बरोबरच वात्सल्य अन रक्षेची ओढ लागलेल्या माता-भगिनी रक्षाबंधनाचे औचित्य साधत रक्ताच्या भावाला जशी राखी बांधून पवित्र रक्षाबंधनाचा सण जसा साजरा करतात, तसाच रक्त आणि नात्याच्या पलीकडे जाऊन मनसेचे पक्ष नेते राजू उंबरकर यांना देखील वणी विधानसभा क्षेत्रातील महिला भगिनी मोठ्या संख्येने दरवर्षी मनसे जनसंपर्क कार्यालयात राखी बांधण्यासाठी येत असतात.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या वणी येथील जनसंपर्क कार्यालयात पवित्र रक्षाबंधनाचा हा भावनिक सोहळा दरवर्षी तेवढ्याच उत्साही आणि आनंदी वातावरणात साजरा होतो. यावर्षी देखील तितक्याच मोठ्या संख्येने आलेल्या महिला भगिनींसोबत वात्सल्य आणि रक्षेच्या पवित्र भावानेतून जपलेला हा बंध तेवढ्याच पवित्र भावनेतून राजू उंबरकर यांनी सपत्नीक तितक्याच मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला आणी दीड तपापूर्वी सुरू झालेल्या वात्सल्य आणि रक्षेच्या या पवित्र दिनी शेकडो महिला भगिनींकडून न चुकता राजू उंबरकर यांनी पवित्र नात्याचे बंध म्हणजेच “राखी” बांधून घेत भारतीय संस्कृतीच्या पवित्र सणाचे नाते अधिक घट्ट केले.
भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला कुटूंबापुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही. सख्या भावाकडे बहिणीची दृष्टी निर्मळ आणि प्रेमपूर्ण राहते. म्हणूनच सख्ख्या बहिणीने सख्ख्या भावाला राखी बांधण्याबरोबरच समवयस्क एखाद्या बहिणीने दुसर्या भावाला राखी बांधल्यास त्यामध्ये शील रक्षणाची जबाबदारी येते.
सारांश…
रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे, रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे, रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर !…
भाऊ आणि बहिण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक आहेत हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देण आहे. अशा भावना व्यक्त करीत…
रेशमी धाग्यात रंग आहे. प्रेम, वात्सल्य, आपुलकी, अन जिव्हाळ्याचा…
दादा, तू नेहमी आनंदात रहा. यशाचे शिखर गाठत रहा, ह्याच इच्छेसह… शेकडो माता भगिनींकडून राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा स्वीकारत, मनसेचे नेते राजू उंबरकरांनी भावा-बहिणीच्या या अतूट नात्याला उजाळा देणारं हे नातं आणखी घट्ट करणाऱ्या ‘रक्षाबंधन’ या पवित्र सणानिमित्य माता भगिनींच्या रक्षणाबरोबरच त्यांना स्वावलंबी करण्यासाठीचे अभिवचन देत आलेल्या शेकडो माता भगिनींना राखीची म्हणजेच रक्षाबंधनाची ओवाळणी दिली. आणी वात्सल्य आणि रक्षेचा बंध जपणारा भारतीय संस्कृतीचा रक्षाबंधनाचा पवित्र सण तितक्याच पवित्र भावनेतून अन उत्साहातून सपत्नीक शेकडो कार्यकर्त्यांसमवेत कौटुंबिक वातावरणात साजरा केला.