गॅस तुटवड्याविरोधात मारेगावात संतापाचा स्फोट…!


घरगुती गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्याविरोधात वंचित बहुजन आघाडी तर्फे आज मारेगाव येथे जोरदार व आक्रमक आंदोलन करण्यात आले. बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्पष्ट आदेशाचे पालन करत राज्यभर एकाच वेळी हे आंदोलन पार पडले.
या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच तालुका व शहर पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून करण्यात आले. आंदोलनात कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

“नरेंद्र… कब मिलेगा सिलेंडर..?” या घोषणांनी मारेगाव दणाणून गेले होते. आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र शब्दांत हल्ला चढवत, जनतेच्या मूलभूत गरजांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध व्यक्त केला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत आरोप केला की, देशातील जनता महागाई, बेरोजगारी व गॅस तुटवड्याच्या संकटात होरपळत असताना सरकार मात्र निवडणूक प्रचारात गुंग असून, जनतेच्या मूलभूत प्रश्नांपासून पळ काढत आहे.
“घरात चूल पेटत नाही आणि सरकार सत्तेसाठी प्रचारात मग्न आहे” अशा शब्दांत संताप व्यक्त करण्यात आला.
तसेच, सरकार विदेश दौरे व आंतरराष्ट्रीय प्रतिमा उभारण्यात व्यस्त असताना, देशातील सामान्य नागरिकांना स्वयंपाकासाठी गॅस मिळत नाही, ही अत्यंत लज्जास्पद बाब असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले आहे.

गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा, काळाबाजार व वाढते दर यामुळे सर्वसामान्य जनतेचे जीवन असह्य झाले असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे ही परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात गॅसचा नियमित पुरवठा, दरकपात, काळाबाजार रोखणे व वितरण व्यवस्था सुधारण्याच्या ठोस मागण्या करण्यात आल्या.

जर शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर यापेक्षाही अधिक तीव्र आणि व्यापक आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी… वंचित बहुजन आघाडी मारेगांव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मून, कार्याध्यक्ष अनिल खैरे, मारेगाव शहराध्यक्ष अनंता खाडे, कार्याध्यक्ष रवींद्र तेलंग, महासचिव विनेश मेश्राम, महिला शहर अध्यक्ष रेखा काटकर, महासचिव शीतल तेलंग, पुष्पा ताकसांडे, निळावती मुन, गोरखनाथ पाटील, धनराज मून, प्राणशील पाटील, अमरनाथ तेलतुंबडे, गौतम मालखेडे, डोमाजी हस्ते, यशवंत पाटील, हंसराज पाटील महादेव पाटील, व्ही एल फुलझले, अनिल महाकुलकार, शांताबाई किन्हेकर, अंजली टेकाम, सविता आत्राम, राजू बलकी, अविनाश कन्नलवार, जुगल आत्राम, हर्षद पाटील यांचे सह मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगांव शाखेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचा संताप आज मारेगावात उसळला. वंचित बहुजन आघाडी तर्फे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाचे काटेकोर पालन करत जोरदार आंदोलन करण्यात आले. “घरात चूल पेटत नाही आणि सरकार प्रचारात मग्न आहे” एकीकडे जीवन जगण्याच्या साध्या साध्या प्रश्नात जनता त्रस्त आहे तर दुसरीकडे सरकार मात्र मस्त मजेत आहे, अशा शब्दांत संताप व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व राजू निमसटकर यांनी करत सरकारच्या जनविरोधी धोरणांवर कडाडून हल्ला चढवला.


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment