जनकल्यान हेचं अंतिम ध्येय, म्हणूनच दावेदारी – समाजसेवी विजयबाबू चोरडीया


“कबीरा खड़ा बाज़ार में,
मांगे सबकी खैर,
ना काहू से दोस्ती,
न काहू से बैर…!”
हेचं अमृततुल्य विचार जीवनात अंगीकारत समाजसेवेचा ध्यास घेतलेले आणी मागील अनेक वर्षापासुन गरजवतांसाठीचा “हक्काचा माणूस” म्हणून समाजसेवेचे कार्य अवीरतपणे, दायित्व म्हणून सेवाभावी वृत्तीने पुढे नेत असलेले, समाजसेवी तथा भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य विजयबाबू चोरडीया यांनी आता, सत्तेच्या न्यायमंदिरात जावून अधिक जोमाने जनकल्यान करण्यासाठी पक्षश्रेष्ठीकडे विधानसभेची दावेदारी दाखल केली आहे. मागील दोन दशकापासुन अविरतपणे जनतेप्रती न्यायाचे समाजकारण, राजकारण करीत असल्यामुळेच, माझा पक्ष माझ्या कार्याची दखल घेईलच हा माझा विश्वास असून मला पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिली तर विजयीपथाला गवसनी घालून “विजय” प्राप्त करेन व पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवीलचं, असा विजयी आशावाद समाजसेवी विजयबाबू चोरडीया यांनी व्यक्त केला. ते वणी येथील श्री विनायक मंगल कार्यालयाचे सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलतं होते.

हक्काचा माणूस – समाजसेवी विजयबाबू चोरडीया
दोन दशकापेक्षा अधिक काळ
वणी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावांत, ज्यांच समाजकारणात हक्काने नाव घेतल्या जाते, व ज्यांना खऱ्या अर्थाने “हक्काचा माणूस” म्हणून ओळखल्या जाते, त्या समाजसेवी विजयबाबू चोरडिया यांनी आपल्या मृदु व प्रेमळ स्वभावाने विधानसभा क्षेत्रातील अनेक गावात आपल्या हक्काची हजारो माणूसे, हक्काचे हजारो कार्यकर्ते निर्माण केले आहेत. इतकेच नाही तर त्याच अविरत सामाजिक सेवेच्या माध्यमातून त्यांचा संपूर्ण विधानसभा क्षेत्रात दांडगा जनसंपर्क देखील स्थापित झाला आहे. जाती-पातीच्या पलीकडे जाऊन सर्वांगाने राबवित असलेल्या सामाजिक कार्यामुळेच समाजसेवी विजयबाबू चोरडिया यांचे सर्वच स्तरातील जनमानसांशी वैयक्तिक जिव्हाळ्याचे संबंध प्रस्तापित झाले आहे. यासह पक्षीय स्तरावरील विविध सामाजिक राजकीय उपक्रमामुळे ग्रामीण कार्यकर्त्यांची नेतृत्वाचे प्रती असलेली नाळ विजयबाबूच्या रुपाने अधिक घट्ट जुळल्याने, पक्षीय स्तरावरील देखील हक्काच नेतृत्व म्हणून विजयबाबू यांचेकडे बघितल्या जाते आहे. इतकेच नाही तर, सर्वसामान्यांच सक्षम नेतृत्व आणि विधानसभेच्या विजयीपथावर विजय संपादन करणार नेतृत्व म्हणून देखील संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्रातील पक्षीय कार्यकर्त्यासह सर्वसामान्य जनतेमध्ये ओळख निर्माण झाली आहे, हे विशेष.

विविध क्षेत्रात भरीव कार्य
सामान्य माणसांच्याप्रती कणव आणि कळवळा असलेला माणूसच त्यांच्या न्यायाची आणि हक्काची बाजू पुढे करतो आणी त्यासाठी रस्त्यावरची लढाई रस्त्यावरच लढत आंदोलनाची प्रत्यक्ष भूमिका देखील घेतो.
याच भूमिकेतुन दोन दशकापूर्वी समाजसेवी विजयबाबू चोरडिया यांची कामगारांच्या न्याय हक्काच्या आंदोलनाच्या रुपाने समाजकारणातून राजकारण अशी सुरुवात झाली आणि त्यानंतरचा हा प्रवास “समाजसेवी विजयबाबू – हक्काचा माणूस” असा इथपर्यंत येऊन पोहोचलाय.
या दरम्यानच्या काळात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविधांगी कार्याला सामाजिक राजकीय उपक्रमाचे माध्यमातून स्पर्श करीत, कधी गरजवंतासाठी हक्काचा माणूस तर कधी दुबळ्या वृद्धांचा आधार म्हणून धावून गेलेला हक्काचा माणूस तर कधी जाती-पातीच्या पलीकडे जाऊन सर्वधर्मीय श्रद्धेची जोपासना करणारा आणि त्यासाठी तन-मन-धनाने पुढे आलेले समाजसेवी विजयबाबू चोरडिया हे गाव खेड्यातील जनमाणसांच्या हक्काचा माणूस ठरलेत. अगणित आरोग्य शिबिराचे आयोजन, हजारो गंभीर रुग्णांच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारी, शेकडो अपंगांना व्हिलचेअर वाटप. हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत. वणी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावात मदतीने वाचनालय व अभ्यासिका सुरु. पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत. खेळाडुंच्या प्रोत्साहनासाठी अनेकदा भव्य स्पर्धेचे आयोजन. सर्व धर्मीय उपक्रमात कुटुंबीयांसह सहभाग. यासह अशा अनेक समाजसेवी कार्यातून समाजसेवी विजयबाबू चोरडिया यांचे कार्य प्रत्यक्ष जनमाणसांसमोर आहे.


विधानसभा उमेदवारीवर दावा…
पक्षात उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकारी आहे. मी मागील 35 वर्षांपासून समाजकारणात असून गेल्या 20 ते 25 वर्षांपासून राजकारणात आहो. सध्या विधानसभेसाठी विरोधी पक्षातर्फे कुणबी उमेदवारांची चर्चा सुरु आहे. त्यामुळे कुणबीत्तर उमेदवार म्हणून मी एक सक्षम पर्याय भाजपकडे आहे. त्यामुळे पक्ष माझ्याबाबत नक्कीच विचार करेल, अशी मला आशा आहे.
विजय चोरडिया

नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment