आज अभिष्टचिंतन सोहळा …!


एका भगीरथ सेवकाचा ध्येयवेडा प्रवास…!

जन सामान्य माणसाच्या विकास उत्कर्षाची स्वप्ने पहात, क्षेत्रातील काँग्रेस नेतृत्वाचा झेंडा लिलया खांद्यावर सहजतेने पेलत, अत्यंत विषम परिस्थितीतून पुढे आलेले आणि संपूर्ण परिसरात “भगीरथ सेवक” म्हणून सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी प्रस्थापित व्यवस्थेसी सातत्याने दोन हात करणारे, सर्वांनाच आपल्या हक्काचा माणूस वाटणारे, काँग्रेस नेते मा. संजय खाडे यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा संपूर्ण विभागात तितक्या विधायक कृतिशीलतेतून साजरा होत आहे.

शेतकरी कुटुंबातल्या जगण्यातलं वास्तव आणि त्याची दाहकता जगलेल्या संजय खाडे यांनी समग्र परिवर्तनाचा ध्यास उराशी बाळगत जमेल त्या परीने सर्वांगाने प्रयत्न चालविलेत. मग व्यवस्थेच्या विरुद्ध जन आंदोलनाचा रेटा असो वा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदान असो वा व्यक्तिगत स्तरावरील दानत्वाच देनं असो. अशा या प्रत्येक क्षेत्रात पुढे असलेल्या भगीरथ सेवकाचा अभिष्टचिंतन सोहळा, विभागातील विविध ठिकाणी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शेकडो चाहत्यांकडून आयोजित करण्यात आलेला आहे. आयोजित सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील आयोजकांनी केले आहे.

विभागाचे आराध्य दैवत श्री रंगनाथ स्वामी देवस्थानात सकाळी ८ वाजता विधिवत पूजा-अर्चना आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार सोहळा. ग्रामीण रुग्णालय वणी येथे भेट आणि रुग्णांना फळ-साहित्य वाटप. वणी तालुक्याचे कायर येथे सकाळी १०:३० वाजता भेट. मुकुटबन येथे दुपारी ११ वाजता सत्कार सोहळा तर दुपारी १ वाजता भीमनाळा,घोन्सा येथे भेट. वणी येथे दुपारी २ वाजता विविध ठिकाणी सत्कार सोहळ्या नंतर दूपारी ४ वाजता मारेगाव येथील शेतकरी मंदिरात कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभ तर सायंकाळी ६ वाजता वणी येथील बाजोरिया लॉन येथे विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.

एका सामान्य शेतकरी कुटुंबात वणी तालुक्याचे उकणी येथे २३ मे १९७० रोजी जन्म. कौटुंबिक जबाबदारी म्हणून शिक्षणानंतर डब्लू.सी.एल.ला नोकरी. जाणिवेचा माणूस म्हणून सामाजिक सेवेची ओढ आणि मग त्यातूनच उकणी ग्रा.पं. च्या सरपंच पदापासून राजकीय प्रवासाला सुरुवात ते थेट अंगी असलेल्या प्रभावी नेतृत्वाच्या कार्यकुशलतेमुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेड मध्ये वावर आणि आता वर्तमानात क्षणाक्षणाला उंचावत जाणारा राजकीय सामाजिक थक्क करणारा प्रवास.

अध्यक्ष – शिवकृपा शेतकरी फाउंडेशन उकणी.
अध्यक्ष – रंगनाथ स्वामी शेतकरी उत्पादक कंपनी वणी.
संस्थापक अध्यक्ष – जय जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह
संचालक – दि. वसंत सहकारी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी वणी.
संचालक – महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित मुंबई. इत्यादी प्रतिष्ठेच्या पदावर त्यांच आजही अधिराज्य कायम आहे.
प्रभावी कार्यकर्तृत्वाच्या जोडीला असलेल्या नेतृत्व शैलीमुळे पुढचे पाऊल पुढेच टाकत विद्यार्थी दशेपासूनच नेतृत्व गुण अवगत असलेल्या संजय खाडे यांनी विविध क्षेत्रातील अनेक महत्त्वाची पदे भूषविली असून आजही अनेक प्रतिष्ठेच्या पदावर त्यांचं अधिराज्य कायम आहे.


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment