विजयबाबू म्हणजेच दानत्वाचे धनी…!


अभागी निराधार जगण्यातलं आयुष्य,
कुणाचाही आधार नसल्याने मागील काही वर्षांपासून घराबाहेर देखील पडू न शकलेले, जीवनाचा एकमेव आधार असलेल्या अर्धांगिनीचा अकाली मृत्यूने अधू झालेले, मुलबाळांची रिकामी झोळी असलेले. याहून कमी की काय, दुर्धर आजारामुळे दोन्ही पाय अधू होतं अंधत्व आल्याने निराधार अवस्थेत अत्यंत हालाखीचे जीवन जगणा-या वणी तालुक्याचे मेंढोली येथील एका आभागी वृद्धाला, ” विजयबाबू चोरडिया म्हणजेच दानत्वाचे धनी ” अशी संपूर्ण विभागांमध्ये ओळख असलेले समाजसेवी विजयबाबू चोरडिया यांनी व्हिलचेअरची भेट दिली. आणी मरणाच्या दारावर असलेल्या एका वृद्धाला विजयबाबुंनी जगण्याचे बळ देत, “विजय बाबू वृद्धाच्या जगण्याचा आधारवड ठरले.”

वणी तालुक्यातील शिरपूर जवळील मेंढोली येथील 65 वर्षीय जानबा करणू कोवे असे आभागी वृद्धांचे नाव आहे. शेतात मजुरी करून कसेबसे जीवन जगायचे. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांच्या पायाला आजार झाल्याने त्यांचे दोन्ही पाय अधू झाले. मुलंबाळं नसल्याने केवळ पत्नीचाच त्यांना आधार होता. मात्र तीन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. आणी तेव्हापासून त्यांच्या जगण्याचा आधारच गेला. दैवाला एवढेच कमी होते की काय, काही दिवसातच त्यांचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला. पुढे डोळ्यांना योग्य तो उपचार न मिळाल्याने त्यांच्या दुस-या डोळ्यावरही परिणाम झाला. पाय पूर्णपणे निकामी आणि डोळे ही काही प्रमाणात अधू झाल्याने अठरा विश्व दारिद्रयाने विळखा घातलेल्या जानबा मग घरीच राहायचे. त्यांना उचलण्यासाठीही 3 ते 4 लोकांची मदत लागायची.

त्यांची ही परिस्थिती स्माईल फाउंडेशनचे सागर जाधव यांना मिळाली. सागर जाधव यांनी त्यांची ही माहिती समाजसेवी विजय चोरडिया यांच्या पर्यंत पोहोचली. विजय चोरडिया यांनी जानबाला मदत करण्याचे वचन दिले. आणी लगेच दिलेला शब्द पूर्ण करीत, बुधवारी दिनांक 20 मार्च रोजी जानबा यांना समाजसेवी विजयबाबू चोरडिया यांच्या हस्ते व्हिलचेअरची भेट देण्यात आली. एवढ्यावरच विजयबाबूचे दानत्व थांबले नाही तर, जानबा यांचा दुसरा डोळा ही अधू आहे. डॉक्टरांनी त्यावर उपचार होणे अशक्य असल्याचे सांगितले. मात्र डोळ्याची शस्त्रक्रिया शक्य असल्यास त्यासाठीही प्रयत्न करणार, अशी ग्वाही जानबाला विजयबाबू चोरडिया यांनी दिली.


या दानत्वाच्या गोड भेटीत, जानबाच्या करूण आयुष्याची कहाणी अधोरेखित करताना, कविवर्य सुरेश भट यांच काव्य आठवल्याशिवाय राहवत नाही.


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment