● हजारो दृष्टीहिनांचा दृष्टीदाता ● सामाजिक दायित्वाचा समाजसेवी ● रक्ताच्या नात्या पलीकडची बांधिलकी |
वणी : राजू निमसटकर
सामाजिक दायित्वाचे ऋण फेडणारी बांधिलकी जपत जगणारा ध्येयवेडा समाजसेवी विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस, तेवढ्यात सामाजिक बांधिलकीतून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा झाला. आणि…
हजारो दृष्टीहीनांना दृष्टीदेत,अंधारलेल्या वाटेवरच्या वाटसरूचा “विजय बाबू” प्रकाश किरण ठरला.
“४ सप्टेंबर” हा विजय बाबू चोरडिया यांचा जन्मदिवस. आणि म्हणूनच, दरवर्षीच्या दिनदर्शिकेतील सप्टेंबर महिन्याची सुरुवात, श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती वणी या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह, सामाजिक बांधिलकीच्या ध्येयाने प्रेरित असलेल्या आणि सामाजिक दायित्वाचे धनी म्हणून लोकप्रिय असलेल्या “विजय बाबू चोरडिया” यांचे वरती प्रेम करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना,सामाजिक दायित्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी मिळालेली आनंदाची पर्वनीच असते. याची प्रचिती वणी विभागातली जनता दरवर्षी “याच देही याच डोळा”अनुभवते देखील.
समाजसेवी “विजयबाबू” यांचा वाढदिवस यावर्षी जेवढ्या सामाजिक दायित्वातून पार पडला तेवढ्याच, सर्वांगाने परिपूर्ण असलेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक विधायक कार्यक्रमाचाही भरभरून सहभाग होता. मारेगाव येथील सुविधा मंगल कार्यालयातील आयोजित मोफत नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिरापासून सुरु झालेल्या आणी कायर येथिल कोळी समाज मंदिरातील मोफत नेत्र शस्त्रक्रिया व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिरापासुन तर वणी विभागातल्या जनतेचे आराध्य दैवत असलेल्या श्री जैताई माता देवस्थानातील नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांपर्यंत हजारो नेत्र रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. आणी म्हणूनच… हजारो दृष्टीहीनांना दृष्टीदेत, अंधारलेल्या वाटेवरच्या वाटसरूचा “विजयबाबू चोरडिया” प्रकाश किरण ठरला. अश्या अनेकांच्या प्रांजळ प्रतिक्रिया आहेत.
सामाजिक दायित्वाचे ऋण फेडण्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे भान जपत जगत असलेला सामाजिक दायित्वाचा धनी, “विजयबाबू चोरडिया” केवळ जन्मदिवसाचा उत्सवच साजरा करतो असे नाही. तर “विजयबाबू” जगण्यातला प्रत्येक क्षण सामाजिक जाणीवेच्या कार्याने भरभरून जगत असतो. आणि म्हणूनच, “विजयबाबू चोरडिया” यांच्या पर्यंत आलेला माणूस कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही. एवढं “दानत्व” गेल्या अनेक वर्षापासून विभागातली जनता अनुभवते आहे. असं हे सामाजिक दायित्वाचं भान जपणारं सामाजिक कार्य सर्वांगाने परिपूर्ण असून आता या सामाजिक कार्याला, समाजसेवी विजयबाबू चोरडिया यांचे वरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसासह जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती वणी, बजरंग दल जिल्हा यवतमाळ, विश्व हिंदू परिषद व आदर्श महिला बहुउद्देशीय संस्था मारेगाव यांचेसह विविध सामाजिक संघटनांचे देखील सहकार्य लाभते आहे, हे विशेष.
“आज वणीत उधळला जाणार भगवा रंग” समाजसेवी “विजयबाबू चोरडिया” यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वणी शहराच्या शासकीय मैदानावर “ये भगवा रंग” फेम सुप्रसिद्ध गायिका शहानाज अख्तर यांच्या बहारदार आणि तितक्याच दमदार भजन संध्या कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे. सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत चालणाऱ्या या धमाल संगीतमय भजन संध्या सोहळ्याला हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन, जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती वणी, बजरंग दल जिल्हा यवतमाळ व विश्व हिंदू परिषदेने केले आहे… |