भीषण अपघात, हादरली पंचक्रोशी
एकाच कुटुंबातील चार जन जागीच ठार…


● सामाजिक कार्यकर्ता युशूफ शेख सह
● कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू
● पडोली-घुग्घूस मार्गावर घडला अपघात
● परतिच्या प्रवासात घडली दुर्दैवी घटना

वणी : राजू निमसटकर

कौटुंबिक मंगलकार्य आटपून चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथून परतीच्या प्रवासात असलेले मारेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शेख युसुफ शेख नबी यांचे सह कुटुंबातील चार जणांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पडोली-घुग्गुस मार्गावरील नागाळा गावाजवळ शुक्रवार दि.२३ जून चे दुपारी २ वाजताचे सुमारास हा भीषण अपघात घडला.

अपघाताची भीषणता एवढी होती की, बोलेरो गाडीतील मृतदेहाला बाहेर काढताना कटरच्या साह्याने गाडीला कापावे लागल्याचे कळते. ही दुर्दैवी घटना वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली आणि संपूर्ण मारेगाव हादरले.

सामाजिक कार्यकर्ते शेख युसुफ शेख नबी, पत्नी-मुमताज युसूफ शेख, शेख रफीक शेख नबी,पत्नी-संजिदा रफीक शेख, रा.सर्व मारेगाव असे अपघातात ठार झालेल्या दोन सख्या भावंडासह त्याच्या पत्नीची नावे आहेत.

मारेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शेख युसुफ शेख नबी हे आपल्या मुमताज नामक पत्नीसह मोठे बंधू शेख रफिक शेख नबी व त्यांची संजिदा नामक पत्नी यांना सोबत घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील नातेवाईकांकडे साक्षगंधाच्या मंगलकार्याला गुरुवार दि.२२ जूनला गेले होते. मंगलकार्य आटपुन शेख युसुफ शेख नबी हे कुटुंबीयांसह दुसरे दिवशी (शुक्रवार दि.२३ जून) स्वतःचे मालकीची असलेल्या बोलेरो गाडी क्रमांक एम.एच. 29 बी.सी. 6321 ने परतीच्या प्रवासात होते, यावेळी ते स्व:ता गाडी चालवीत होते. चंद्रपूर-पडोली-घुग्गुस मार्गावरील नागाळा गावाजवळील अहमद लॉन जवळ बोलेरो गाडीवरून चालकाचे नियंत्रण सुटले आणी गाडी दुभाजकाला ओलांडून दुसऱ्या मार्गवर गेली. यावेळी बोलेरो गाडीचा टायर फुटल्याचे बोलले जात आहे. नेमक्या याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कंटेनरची गाडीला जोरदार धडक बसली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले.

अपघाताची भीषणता एवढी होती की, बोलेरो गाडीचा पुढील भाग पूर्णतः चकणाचुर झाला होता. आणि गाडीतील चालकासह असलेली चारही माणसे जागीच ठार झाली होती. हा भीषण अपघात पडोली-घुग्गुस मार्गावरील नागाळा गावाजवळ दुपारी २ वाजताचे सुमारास घडला.

या भयावाह अपघाताची माहिती वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली आणि नजीकच्या पडोली पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहनातील मृतकाना बाहेर काढले व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे शवविच्छेद करण्यासाठी पाठविण्यात आले. अपघात एवढा भीषण होता की, बोलेरो गाडीतील मृतदेहाला बाहेर काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करावा लागल्याचे कळते. सदर घटनेचा पुढील तपास पडोली पोलीस करीत आहे.

अपघाताची भीषणता मन पिळवटून टाकणारी होती. मनाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघातात मारेगाव येथील दोन सख्खे भाऊ व त्यांच्या दोन्ही पत्नी यांचा जागीच दुर्दैव मृत्यू झाला असून मन शून्य करून टाकणाऱ्या या घटनेने संपूर्ण मारेगाव शहर हादरले आहे. सामाजिक कार्यकर्ते शेख युसुफ शेख नबी यांचा मृतक थोरला भाऊ रफीक शेख यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी आहे तर लहान भाऊ शेख युसुफ शेख नबी यांच्या पश्चात दोन मुली आहे.


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment