| ● शासकीय परिसरातील रस्त्याची लागली वाट ● मदतीला धावले सामाजिक कार्यकर्ता. ● बापलेकाने सुरु केले रस्त्यावरच आंदोलन ● अन्यथा, उद्यापासूनच आमरण उपोषण ● आंदोलक पोटे बापलेकाचा प्रशासनास ईशारा |
वणी : राजू निमसटकर
रस्ता निर्मितीचे काम म्हटले की, शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधीची सर्वात मोठी महत्वपूर्ण भूमिका असते. किंबहुना त्यांच्या सहयोगाशिवाय कार्यच पूर्ण होत नाही, मात्र ज्या रत्यावरून हजारदा हे अधीकारी लोकप्रतिनिधी सारखे ये-जा करतात त्याचं रस्त्याची जर का वाट लागली असेल तर मग, “दिव्या खाली अंधार” चं म्हणावा लागेल. आणी याच अभिनव कार्याच्या योग्य त्या निर्माणासाठी जर का सामाजिक कार्यकर्ता तोही स्वतःच्या मुलाला सोबत घेऊन पुढे सरसावला असेल तर मग, अश्या अभिनव बाप-लेकाच्या आंदोलनाची चर्चा तर होणारच…

हे अभिनव आंदोलन सुरु आहे, वणी शहराच्या मुख्य शासकीय परिसरातील मुख्य रस्त्याच्या योग्य त्या रस्ता निर्माणासाठी. आणी हं हे आंदोलन छेडलेय सामाजिक कार्यकर्ता दादाजी पोटे आणी त्याचा मुलगा गोपाल पोटे या बाप-लेकाने. मात्र ज्यांच्या साठी हे आंदोलन सुरु झालेय, त्यांनीच या आंदोलनाकडे पाठ फिरविल्याने शासन प्रशासनाच्या कोडकेपणावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ता दादाजी पोटे यांचेकडून याच रस्त्याच्या योग्य निर्माणासाठी २०२१-२२ साला पासून अनेकदा शासन प्रशासनाचे दरबारी अर्ज विनंत्या झाल्यात, लेखी निवेदने झालीत, प्रत्यक्ष भेटीगाठीही झाल्यात. मात्र आपल्याच दारासमोरचा रस्ता अधिक चांगला व्हा हेच ज्यांना वाटत नाही, त्यांच्या बद्दलचा संताप आंदोलनाचे स्थळी अनेकांच्या तोंडी होता. हे मात्र दुर्दैवच म्हणावे लागेल.

एका सामाजिक कार्यकर्त्याला शासकीय कार्यालयात जाणारा रस्ता अधिक चांगला असावा असे वाटने, ही अभिनंदनाचीच बाब म्हणावी लागेल. मात्र, त्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करीत शांततेच्या मार्गाने, त्याच प्रशासकीय अधिकाऱ्यानां लोटांगण घालत, स्वतःच्या मुलाला सोबत घेऊन त्याच रस्त्यावर बैठा सत्याग्रह करणारे अभिनव आंदोलन वणीकरांसह शासकीय कामाकरिता आलेल्या परिसरातील नागरिकांनी अनुभवले. मात्र म्हणतात ना “दिव्या खाली अंधार” हिच म्हण अभिनव आंदोलनाच्या निमित्याने सर्वांच्या तोंडी होती हे विशेष.

![]() वणी शहराच्या शासकीय परिसरातील मुख्य रस्ता अधिक चांगला व्हावा. या रस्त्यावरून ग्रामीण भागातील जनतेला सारखी ये जा करावी लागते. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आणि म्हणून, या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचे अपघात होऊ नये यासाठी मी अनेकदा या रस्त्याच्या योग्य निर्माणा साठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना अर्ज विनंत्या निवेदने दिलीत. त्याचा कुठलाच फायदा झाला नाही. आणि म्हणून शेवटी नाईलाजाने याच रस्त्यावरून जाणाऱ्या अधिकाऱ्यांना लोटांगण घालत बैठा सत्याग्रह सुरू केलाय. या आंदोलनाची तात्काळ दखल न घेतल्यास उद्यापासून मी याच ठिकाणी बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात करेल. आंदोलक दादाजी लटारी पोटे |







