जोपासले सामाजिक दायित्व…!


वृद्धाश्रमाला दहा हजार रुपयाची भेट
सामाजिक सेवेच अविरत व्रत
सामान्यांच्या सहवासात साजरा झाला
संजय खाडे यांचा जन्मदिवस सोहळा

वणी :- विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक सेवेची ओढ त्यातच पत्रकारितेचा व्यासंग आणि आता यशस्वी मुसद्दी राजकारणी असा चढता आलेख असलेले, वसंत जिनिंगचे संचालक तथा रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड वणीचे अध्यक्ष संजय खाडे यांचा जन्मदिवस सोहळा तितकेच सामाजिक दायित्व जोपासत सर्वसामान्यांच्या समवेत नुकताच साजरा झाला.

सामाजिक बांधिलकीचे भान जपत रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड वणीचे अध्यक्ष तथा वसंत जीनिंग वणीचे संचालक असलेले संजय खाडे यांचेवर प्रेम करणाऱ्या सहकार्यानी, त्यांचा जन्मदिवस सोहळा तितक्याच विविध सामाजिक उपक्रमातून साजरा केला.

विशेष म्हणजे कुटुंबीयांसह वणी तालुक्याच्या पळसोनी परिसरातील श्री बाजीराव महाराज वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांना फळ वाटप करून त्यांना सांत्वना देत आधार दिल्या गेला. व सर्वसामान्यांसमवेत जन्मदिवस सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी संजय खाडे यांचे कुटुंबियांकडून वृद्धाश्रमाला दहा हजार रुपयाची आर्थिक भेट देखील देण्यात आली. याप्रसंगी वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सुहास नांदेकर यांचेसह वृद्धाश्रमाचे संचालक देखील उपस्थित होते.


संजय रामचंद्र खाडे यांचा जीवन प्रवास तसा पूर्णतः सामाजिक दायित्व जोपासत चढत्या आलेखाप्रमाणे पुढे जाताना दिसतो आहे. विविध सामाजिक क्षेत्रातील त्यांचे भरीव योगदान सर्वां पुढे आहे. यापुढेही आयुष्याचा प्रत्येक क्षण सर्वसामान्यांच्या सेवेसाठी खर्च करेन अशी ग्वाही अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी सामाजिक दायित्व जोपासत जगणारा ध्येयवेडा समाजसेवी संजय रामचंद्र खाडे यांनी आवाज माझा शी बोलतांना सांगितले.



नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment