◾ आर्या चौधरी यवतमाळ जिल्ह्यात दुसरी ◾ तर वणी तालुक्यात पहिल्या क्रमांकावर ◾ तीन विषयात १०० पैकी १०० गुण ◾ सी.बी.एस.सी. बोर्डच्या इयत्ता १० वीचा निकाल जाहीर… |
वणी : राजू निमसटकर
सी.बी.एस.सी. बोर्डाच्या इयत्ता १० वीचा निकाल नुकताच घोषित झाला असून यामध्ये वणीची आर्या चौधरी ही यवतमाळ जिल्ह्यामधून दुसरी तर वणी, मारेगाव, झरी तालुक्यातून पहिली आली आहे.
नुकताच सी.बी.एस.सी. बोर्डाच्या इयत्ता १० वीचा निकाल लागला असून यामध्ये ५०० पैकी ४९१ गुण घेऊन म्हणजेच ९८.२०% गुण घेऊन वणी विभागातील प्रसिद्ध विधीज्ञ अॅड.निलेश चौधरी यांची पुतणी कु.आर्या मनीष चौधरी रवी नगर वणी ही यवतमाळ जिल्ह्यामधून दुसरी तर वणी, मारेगाव, झरी तालुक्यातून पहिली आली आहे.
कु.आर्या मनीष चौधरी हीला हिंदी, गणित आणि आय. टी. विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले असून इंग्रजी विषयात ९७, विज्ञान विषयात ९५ तर सोशल सायन्स विषयात ९९ गुण मिळाले आहे. विशेष म्हणजे फक्त एक गुणाने तिचा पहिला क्रमाकं हुकला आहे.
आय. टी हा विषय ऐच्छिक होता त्याचे गुण विचारात घेतले तर आर्या हिला ६०० पैकी ५९१ गुण मिळाले आहे. म्हणजेच ९८.५०% आर्याला गुण मिळाले आहे.
आर्या ही अल्फोर्स स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल वणीची विद्यार्थिनी आहे. ती तिच्या यशाचे श्रेय तिच्या आई-वडील, शाळेचे संचालक श्री नरेंद्र रेड्डीसर, मुख्याध्यापिका सौ. सोजन्या मॅम, सर्व शिक्षक आणी शिक्षकेत्तर कर्मचारी आणि श्री. लोया सर यांना देत आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील वणीच्या इतिहासात नेहमीच वणी शहराने आपले नाव अग्रक्रमांकावर ठेवले असून यामध्ये विशेषतः मुली अग्रस्थानी राहिल्या आहे हे विशेष. आर्या हिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्रच खूप खूप अभिनंदन होत आहे. |