पुन्हा एकदा वणी होणार, भगवामय…!


● ५ एप्रिलला वणीत स्वा.सावरकर गौरव यात्रा
● दयाशंकर तिवारी यांच्या व्याख्यानाचे आयोजन
● आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे नेतृत्व

वणी : राजू कांबळे

राजकीय नेतृत्वांकडून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल केल्या जात असलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या योगदानाचे स्मरण करून देण्या बरोबरच, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार होत असलेल्या अपमानाचा प्रखर विरोध करण्यासाठी, आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांचे नेतृत्वात भाजपाचे वतीने वणी शहरात ५ एप्रिल ला “स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे” आयोजन करण्यात आले आहे.

गौरव यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण वणी शहर भगवामय केल्या जाणार असून ” होय मी सावरकर ” अशी टोपी घालून या गौरव यात्रेची सुरुवात वणी शहराच्या शासकीय मैदानावरील पाण्याच्या टाकीजवळून सायंकाळी ५ वाजता होणार आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील साधू, संत, हभप मंडळी, सर्व समाजातील सामाजिक संघटना, संस्था व व्यावसायिक संघटनांचा गौरव यात्रेत प्रामुख्याने सहभाग असणार आहे. याबरोबरच या गौरव यात्रेत स्वा. सावरकरांच्या प्रतिमेचा रथ देखील राहणार असून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यावरील देखावे यात असणार आहे. अशी माहिती वणी विधानसभा मतदार संघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी १ एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृह वणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे नेतृत्वात वणी शहराच्या शासकीय मैदानावरील पाण्याच्या टाकी पासून निघणारी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा शहराच्या मुख्य मार्गाने जाणार असून टिळक चौक, संभाजी चौक, गांधी चौक, भगतसिंग चौक, स्वा. सावरकर चौक, टागोर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते पुन्हा टिळक चौक अशी येणार असून या गौरव यात्रेचा समारोप टिळक चौक येथे होणार आहे. गौरव यात्रेच्या समारोपाप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन चरित्रावर नागपूर येथील प्रसिद्ध व्याख्याते दयाशंकर तिवारी यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे. आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत मोठ्या संख्येने वणी विधानसभा मतदार संघातील सर्व सावरकर प्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन, आयोजित पत्रकार परिषदेतून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले आहे.


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment