● वणीकरांनी पहिल्यांदाच अनुभवला ● भूमिपुत्राच्या आगमनाचा देखणा सोहळा ● जन्मभूमीत तरुणाई कडून जल्लोषात स्वागत ● पक्षप्रमुखांनी माझी नेतेपदी केलेली निवड ● हा सन्मान संपूर्ण विभागातील जनतेचा – राजू उंबरकर |
वणी : राजू निमसटकर
तरुणाईच्या मनामनावर अधिराज्य गाजवणारे मनसेचे नेते राजू उंबरकर यांची पक्षाच्या नेते पदी निवड झाली. आणी मतदार संघाच्या नवनिर्माणाची उर्मी छाताडात घेऊन जगत असलेली तरुणाई उधानलेल्या आनंदी जल्लोषात रस्त्यावर उतरली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन, जन्मभूमीत पहिल्यांदाच येत असलेला, तरुणाईचाच नव्हे तर मतदार संघातल्या प्रत्येकाच्याच जीवाभावाचा सखा, लोकनेता मनसेचे नेते राजू उंबरकर यांचे जन्मभूमी वणीच्या शिवतीर्थावर आगमन होत असल्याचा आनंद, तरुणाईसह प्रत्येकाच्याच उधाणलेल्या जल्लोषात दिसून आला. हा अद्वितीय सोहळा वणीकरांसाठी जितका अभिमानाचा तितकाच मतदार संघातील सर्वांनाच गर्वांकित करणारा होता.
मेक इन इंडिया, शायनिंग इंडिया च्या थापा मारत, वाळवंटातल्या मृगजळासारखे मतदार संघातल्या भोळ्या भाबड्या जनतेला पाठीमागे धावायला लावणाऱ्या इथल्या राज्यकर्त्या जमातीच्या नतभ्रष्टपणामुळे, मतदार संघाची पूर्णतःहा वाट लागल्याचे चित्र मागील अनेक वर्षापासून मतदारसंघातला माणूस आणि माणूस याच देही याच डोळा अनुभवतो आहे. हीच चीड नवनिर्माणाचे स्वप्न छाताडात घेऊन जगत असलेल्या तरुणाईच्या माध्यमातून रस्त्यावर उतरली. प्रेमाचा आनंदी ओलावा सोबत घेऊन, आपल्या जिवाभावाचा सखा मनसेचा नेता राजू उंबरकर यांच्या स्वागतासाठी वणी शहराच्या शिवतीर्थावर.
वणीच्या इतिहासात एखाद्या पक्षाच्या नेते पदा पर्यंत पोहोचणारा मनसेचा नेता राजू उंबरकर हा कदाचित विभागातल्या सर्वांसाठी पहिलाच माणूस असेल आणि म्हणूनच हा क्षण प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी वणी शहरासह मतदारसंघातील ठिकठिकाणीच्या गावा-गावा वरून परिवर्तनाची उर्मी सोबत घेऊन जगत असलेला जाणता माणूस आणी माणूस शिवतीर्थावर एकवटला होता. हा क्षण त्याच्यासह मतदारसंघातील जनतेसाठी देखील तितकाच अभिमानाचा अन भूषणावह होता.
तरुणाईचा उधाणलेला आनंदी उत्साह, ढोल ताशाचा गजर आणि दिव्यांच्या लखलखाटात एकदाचे मनसेचे नेते राजू उंबरकर यांचे जन्मभूमी वणी शहराच्या शिवतीर्थावर आगमन झाले आणि एकच जल्लोष झाला ” राजू उंबरकर यांचा विजय असो ” हि गगनभेदी घोषणा कदाचित संपूर्ण वणी विधानसभा मतदारसंघातील जनतेची असेल, म्हणूनच संपूर्ण परिसरात ती गुंजली आणि याच गर्दीत मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी थेट रयतेचे राजे छत्रपती यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे वंदन करून आशीर्वाद घेत सर्वांना अभिवादन केले. हा क्षण सर्वांनाच भावूक करून सोडणार होता.
वणीच्या भूमीतील रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच सजलेले शिवतीर्थ, सभोवताली शुभेच्छांच्या फलकांनी गजबजलेला परिसर आणि मनसे सैनिकांसह चाहत्यांच्या उपस्थितीने फुलून गेलेला रस्ता नी रस्ता. या संपूर्ण आनंदी उधाणात
फटाक्याची आतिषबाजी, आनंदाच्या गगनभेदी घोषणा, रोशनाईचा लखलखात, जेसीबीच्या माध्यमातून उधळलेल्या फुलांची आरास, क्रेनच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधून घेणारा स्वागताचा भव्य दिव्य हार आणि उधाणलेल्या तरुणाईसह सर्वांचाच आनंदी जल्लोष. मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या आगमनाचा हा, न भूतो न भविष्यती असा देखना सोहळा वणी शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुभवास मिळाला, हे विशेष.
हिंदू हृदय सम्राट मनसे प्रमुख राज साहेब ठाकरे यांनी, यानंतर पक्षात आणखी मोठं पद नाही अस मोठं ” नेतापद ” मला म्हणजेच मतदार संघातील जनतेला दिल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जनतेच्या सेवेचा हा, तब्बल दीड तपाच्या कालखंडाचा हा विजय असून, हे श्रेय मतदार संघातील प्रत्येक माणसांचे आहे. साहेबांनी दिलेली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत, संपूर्ण विदर्भात पक्ष बांधणी बरोबरच, बळीराजा शेतकऱ्यांसह बेरोजगार युवकांच्या न्याय प्रश्नांसाठी सातत्याने संघर्षरत राहील. आपले निष्ठा आणि विश्वास असाच कायम ठेवा. मतदारसंघात मनसेच्या माध्यमातून नवनिर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. राजू उंबरकर नेता मनसे |