कार्यकर्ता ते नेता,
भूषणावह राजकीय प्रवास…


● सदैव जनसेवा हा एकच ध्यास
● राजकारणाच्या पलीकडे जाऊन जनतेची सेवा
● पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे कडून कार्याची दखल
● दबंग नेत्याची नेतेपदी निवड – विभागात आनंद

वणी : राजू निमसटकर

बरोबर ९ मार्च २००६ ला शिवसेना पक्ष उभा दुभंगला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निर्माण होऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांच पर्व सुरू झालं. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय. याच ध्येयाला प्रेरीत होऊन कुठलाही राजकीय वारसा नसलेला, अगदी वयाच्या तीशीतला तरुण, मनसेचा झेंडा हाती घेत नवनिर्माणाचे स्वप्न उराशी बाळगून बेभान होऊन कामाला लागला. तालुका, जिल्हा, विदर्भ आणि आता थेट नेतेपद असा ज्यांचा चढता राजकीय आलेख आहे. ते लोकनेते राजू मधुकर उंबरकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेते पदी झालेली निवड, राज्यातल्या तमाम मनसैनिकांसह वणी विभागातील जनतेसाठी निश्चितच भूषणावह आहे.

नवा गडी, नवा राज आणि नव निर्माणाचे नवे स्वप्न उराशी बाळगून जनतेची सेवा करण्यासाठी बेभानपणे निघालेला, तरुणांच्या मनामनावर अधिराज्य गाजविणारा, राज करणारा, वणीच्या भूमीतील नव्या दमाचा नवा कार्यकर्ता राजू मधुकर उंबरकर यांनी मनसेच्या निर्माणा पासून जनसेवेच्या कार्याचा धडाका लावला. आणि मग सुरू झाला, सामाजिक कार्याची जोड लाभलेला राजकीय मनसे प्रवास.

निवडणुका लागल्या की बेडकाप्रमाणे राजकीय नेते कामाला लागतात. आम्हाला किती जनतेची काळजी आहे आणि आम्ही किती जनतेची सेवा करतो आहे, हे दाखविण्याचा मग ते केविलवाना प्रयत्न करतात. मात्र याला पूर्णतःहा अपवाद आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर. निवडणुका असो वा नसो. अविरतपणे जनसेवा आणि केवळ जनसेवाच. मग हे कार्य करीत असताना हा माझ्या पक्षाचा की दुसऱ्या पक्षाचा, हा माझा की तुझा या पलीकडे जाऊन. एकूणच काय तर जाती-पातीच्या, गटा-तटाच्या पलीकडे जाऊन, गरजवंत माणसांची सेवा करणे हेच एकमेव ध्येय आणि कार्य राजू उंबरकरांनी आजपर्यंत अविरतपणे चालविले आहे. या समाजसेवी कार्याची म्हणून किती उदाहरणे सांगावीत. गरिबांच्या मुलीचे लग्न असो, बाळंतपणाचा खर्च असो, वा शिक्षणासाठी लागणारी मदत असो. हतबल बळीराजा शेतकऱ्याला बी बियाणे खताचे वाटप असो किंवा लागणाऱ्या खर्चाची भेट असो. अपंग दिन दुबळ्यांना मदतीचा आधार असो वा बेरोजगारांना रोजगार मिळावा, याबरोबरच बळीराजा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढल्या गेलेले लढे असो. अडल्या, नडल्या, खचल्या गेलेल्यांना दिल्या गेलेला आधार असो. कधी कनवाळू तर कधी दबंग, अशी किती म्हणून राजू उंबरकरांची रूपे सांगावीत, अशी किती म्हणून उदाहरणे द्यावीत. या सामाजिक दायित्वाचे कार्याला जोड लाभली ती राजकीय कार्याची आणि हेच समाजसेवी राजकीय कार्य अविरतपणे चालू आहे.

या समाजसेवी, राजकीय कार्याला आता जवळपास दीड तपाचा काळ लोटून गेला आहे. तरीही विभागातील जनता राजू उंबरकर यांच्या सामाजिक दायित्वाच्या कार्याचा गौरव केल्या वाचून राहत नाही. याची प्रचिती गाव खेड्यातल्या वस्ती वस्तीत अनुभवास देखील मिळते आहे. म्हणूनच की काय, पक्षीय नेतृत्वाने म्हणजेच पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी, मुंबईच्या शिवतीर्थावरील गुढीपाडव्याच्या अत्यंत महत्त्वपूर्ण मेळाव्यात, ज्याप्रमाणे राजू उंबरकर यांच्या कार्याची दखल घेत, त्यांना पक्षाच्या नेतेपदी बसवून त्यांचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला. तोच गौरव विभागातल्या तमाम जनतेनी राजू उंबरकर यांना आपल्या जिव्हाळ्याचा माणूस म्हणत ” लोकनेता ” म्हणून देखील, अनेकदाच्या सभा सोहळ्यांमध्ये सन्मानित करून केला आहे. ही जनसेवी, लोकनेता राजू उंबरकर त्यांच्या कार्याची जनतेने घेतलेली दखल वा त्यांच्या समाजसेवी कार्याची पावतीच म्हणावी लागेल.

समाजहितासाठी कधी कनवाळू तर कधी दबंग अशी अनेकविध रूपे प्रत्यक्ष जीवनात जगलेला, पक्षीय एकनिष्ठतेच जिवंत प्रतिक, साधा कार्यकर्ता ते नेता असा थक्क करणारा राजू उंबरकर यांचा राजकीय प्रवास, जन्मभूमी वणी आणि वणीकरांसाठी अभिमानास्पदच म्हणावा लागेल. याच राजू उंबरकर यांची ” मनसे नेता ” पदी निवड झाल्यानंतरचा आनंद जसा जन्मभूमी वणीकरांना आहे, तसाच आनंद विदर्भातल्या तमाम मनसे सैनिकांना देखील झालेला आहे. आणि म्हणूनच, मुंबईवरून जन्मभूमी वणी कडे होणाऱ्या प्रवासात मनसे सैनिकांकडून मनसेचे नेते राजू उंबरकर यांचे ठिकठिकाणी आनंदी जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत केले जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेते पदी निवड झाल्यानंतर मनसे नेता राजू उंबरकर यांचे जन्मभूमी वणी शहरात आज सायंकाळी ७ वाजता प्रथमच आगमन होत आहे. राजू उंबरकरांच्या आगमनाचा जल्लोष, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात म्हणजेच ” वणी शहराच्या शिवतीर्थावर ” मनसे सैनिकांसह वणीकरांच्यावतीने मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा केला जाणार आहे. हा सोहळा मनसे सैनिकांसह तमाम वणीकरांसाठी अभिमानास्पद असाच काहीसा आहे.


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment