वणीचा ढाण्या वाघ…
शिवतीर्थावर फोडणार डरकाळी !


● दरवर्षी गुढीपाडव्याला शिवतीर्थावर मनसेच्या सभेची परंपरा
● मनसे प्रमुख राज ठाकरे मनसैनिकांसह विराट जनसमुदायाला करतात संबोधित
● यावर्षी विदर्भाचा ढाण्या वाघ राजू उंबरकर शिवतीर्थावर फोडणार डरकाळी

वणी : राजू निमसटकर

शिवतिर्थावर दरवर्षी गुढी पाडव्याला मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जोरदार तोफ धडाडते. याच शिवतीर्थावर २२ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे मनसैनिकांसह विराट जनसमुदायाला संबोधित करणार आहेत. मात्र यावेळी जशी सर्वांनाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या तडाखेबाज भाषणासह जारी केलेला टिझरची प्रतीक्षा लागली आहे. तसीच प्रतीक्षा, विदर्भाचा ढाण्या वाघ मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या सभेतील तडाखेबाज भाषणाची देखील तितकीच उत्सुक्ता विदर्भासह विभागात ताणली गेली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निर्माणा पासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांची गुढीपाडव्याला शिवतीर्थावर सुरू झालेली सभेची परंपरा, या वर्षीही मनसैनिकांसह विराट जनसमुदायांच्या उपस्थितीत गाजणार असल्याचे संकेत मनसेने जारी केलेल्या टिझर वरून दिसते आहे.
धर्म आणि मराठी या दोन विषयांवर वाहिलेला हा टिझर चांगलाच चर्चेत आला आहे.
“ठाकरी तत्त्व-मराठी सत्त्व-धर्माभिमानी हिंदुत्व” असे लिहित…
हिंदू ही दोन अक्षरे जगा,
मराठी या तीन अक्षरांवर प्रेम करा,
महाराष्ट्र या चार अक्षरांसाठी काम करा,
राज ठाकरे ही पाच अक्षरे नेहमीच पाठीशी असतील, असे म्हटले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची हिंदूजननायक ही प्रतिमा अधोरेखित करण्याचा मनसेतर्फे जारी झालेल्या टिझर वरून प्रयत्न दिसतो आहे. त्यामुळे गुढीपाडव्याला शिवतीर्थावर होणारी सभा ही चांगलीच वादळी होणार असल्याचे बोलले जात आहे.

 शिवतीर्थावरील सभेच्या पार्श्वभूमीवर, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षातील काही निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून सभेच्या नियोजनाबाबतच्या सूचना दिल्यात. यावेळी मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या कामाची दखल घेत, गुढीपाडव्याच्या शिवतीर्थावरील विराट सभेत राजू उंबरकर यांना विदर्भातील जनतेच्या प्रश्नावर बोलण्याची संधी, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातून गुढीपाडव्याला शिवतीर्थावर होणाऱ्या सभेला मनसैनिक मोठ्या संख्येने जात असतात. वणी विभागासह संपूर्ण विदर्भातून देखील, मोठ्या संख्येने मनसैनिक जमेल त्या वाहनाने शिवतीर्थावरील यावर्षीच्या विराट सभेला, उपस्थित राहण्यासाठी दोन दिवसांपूर्वीपासूनच निघाले आहेत. नियोजित शिवतीर्थावरील सभेमध्ये यावर्षी विदर्भाचा ढाण्या वाघ, मनसेचा मावळा, मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांची तोफ धडाडणार आहे. त्यामुळे विदर्भातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे, हे विशेष.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निर्माणा पासूनच हिंदू जननायक, वंदनीय राजसाहेब ठाकरे, दरवर्षी गुढीपाडव्याला शिवतीर्थावर मनसैनिकांसह विराट जनसमुदायाला संबोधित करतात. राज साहेबांनी माझ्या कामाची दखल घेत, विदर्भातील जनतेच्या प्रश्नावर, यावर्षी मला शिवतीर्थावरील सभेत बोलण्याची संधी दिली. हे मी माझे अहोभाग्य समजतोय. साहेबांचा सच्चा शिलेदार, मनसेचा मावळा म्हणून, साहेबांचे विचार आणी आदेश वंदनीय मानत, शिवतीर्थावरील सभेत बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहो.
राजू उंबरकर
राज्य उपाध्यक्ष मनसे


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment