मायबाप सरकार, आणखी किती हतबल महिलेच्या कपाळावरचे कुंकू पुसणार आहात… ?


● हतबल बळीराजा…
● अस्मानी आणि सुलतानी संकट
● सततची नापिकी अन जीवनाचा शेवट
● नऊ महिन्याची विवाहिता झाली विधवा

मारेगाव : राजू निमसटकर

सततची नापिकी, वाढता कर्जाचा डोंगर आणि जीवनात आलेल नैराश्य, शेता लगतच्याच विहिरीत उडी घेऊन, शेवटी जीवनाचा शेवट करूनच गेलं. आणि नऊ महिन्याची विवाहिता विधवा झाली. ही हृदय हेलावणारी घटना घडली आज पहाटेचे सुमारास मांगरूळ शेतशिवारात.

श्रमाने कमवायचं आणि आनंदात राहायचं असं मोरेश्वर खडसे यांच कुटुंब अत्यंत प्रतिष्ठेने गावात जगत होतं. कोरोना आला आणि घात झाला. मोरेश्वर खडसेंना कोरोनाने हिरावलं. मोरेश्वर खडसे यांचे पश्चात पत्नी, मुलगा संजय, प्रफुल, आणी सचिन असं मोठं कुटुंब सैरभर झालं.

दिवस पालटल्यागत सततच्या नापिकीने कुटुंबावर खाजगी आणि सरकारी कर्जाचा डोंगर वाढत गेला. जगण्यातलं नैराश्य आणि जीवनात हार मानलेल्या प्रफुलने शेवटी आपल्याच शेतालगत असलेल्या विहिरीत उडी घेत जीवनाचा शेवट केला. आणी नऊ महिन्यांपूर्वीच विवाहबद्ध झालेल्या युवा शेतकऱ्याने अशा प्रकारे जीवन संपविल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला.

सततच्या नैराश्येपोटी मागील दोन दिवसांपूर्वीच प्रकृती अस्वास्थाने मारेगाव ग्रामीण रुग्णालयात प्रफुल हा उपचार्थ भरती होता. नऊ महिन्यापूर्वी विवाहबद्ध झालेल्या प्रफुल सोबत त्याची पत्नी उपचारादरम्यान सोबत देखील होती. उपचारादरम्यान सुट्टी मिळाल्यानंतर प्रफुल हा मूळगावी मांगरुळ येथे आला आणी आज सकाळी प्रफुल्लचा मृतदेह एका शेतातील विहिरीत आढळून आला.

स्वभावाने अत्यंत मनमिळावू असलेल्या प्रफुलच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. प्रफुलने आत्महत्या का केली ? याबाबत अस्पष्टता आहे. प्रफुलच्या पश्चात आई , पत्नी व दोन भावंड असा मोठा आप्तपरिवार आहे.


किती कुंकू पुसणार…
अस्मानी आणी सुल्तानी संकटाबरोबरच सरकारच्या बेजबाबदार धोरनामुळे हैराण झालेला बळीराजा शेतकरी, दर एक दिवसाला कुठे ना कुठे जीवनाचा शेवट करतो आहे. आत्महत्येच्या चक्रव्ह्यूहात कुंकवाचा धनी गेल्याची दाहकता मारेगाव तालुकाच्या गाव वस्तीत आहे. हे भयान वास्तव आहे. मायबाप सरकार, हे भयान वास्तव कधीतरी आपला प्रश्न होऊ द्या ? म्हणजे झालं.

नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment