● राजू उंबरकरांनी उचलली जबाबदारी ● क्रीडा क्षेत्रात मनस्वी देशाचे नेतृत्व करेल ● मनसेचे नेते राजू उंबरकर यांचा आत्मविश्वास ● पुढील खेळासाठी लागणारा करणार सर्व खर्च ● राजसाहेब ठाकरे यांची देखील घडवून आणणार भेट |
वणी : राजू निमसटकर
प्रशिक्षण कालावधी केवळ १८ महिने आणि वय जेमतेम ५ वर्ष. मात्र, जिच्या नावावर फायर गर्ल, गोल्डन गर्ल, जागतिक विक्रमवीर, इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट असे अनेक पुरस्कार इतिहास घडवित आहे. त्या मनस्वी च्या पंखाला मनसेचे बळ लाभले असून, तिच्या पुढील क्रिडा क्षेत्रातील लागणाऱ्या जवळपास सर्व खर्चाची जबाबदारी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी उचलली आहे.
सध्या पुण्यात राहणारी मनस्वी आपल्या मूळ बोटणी या गावी आली आहे हे माहीत होताच, मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी बोटोनी गाव गाठत मनस्वी ची भेट घेतली. व मनस्वी च्या आई-वडील, आजोबांशी कुतूहलाने तिच्याबद्दल चौकशी करीत २१ हजार रुपयाची रोख भेट मनस्वीला दिली. यावेळी राजू उंबरकरांनी मनस्वीला तीच्या पुढील खेळासाठी लागणाऱ्या सर्व खर्चाची जबाबदारी उचलत असून येत्या काळात मनस्वीची राजसाहेब ठाकरे यांचेसी भेट देखील घडवून आणणार असल्याचा शब्द दिला.
मनस्वी येत्या काळात स्केटिंग या खेळातून क्रीडा क्षेत्रात देशाचे नेतृत्व करेल व जागतिक स्तरावर ऐतिहासिक विक्रम स्थापित करेल, असा आत्मविश्वास मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी यावेळी व्यक्त केला. व मनस्वीला आतापर्यंत मिळालेल्या पुरस्काराबद्दल तिचे मनस्वी कौतुक देखील केले. |
” मनस्वी ” नेमकी कोण आहे…
मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्याच्या बोटोनी या गावचे मूळ रहिवासी असलेले विशाल विठ्ठल पिंपरी यांची मुलगी कुमारी मनस्वी विशाल पिंपरे या अवघ्या पाच वर्षाच्या चिमूरडीने स्केटिंग या खेळात राज्यस्तरीय तथा राष्ट्रीय स्तरावरील अनेक सुवर्णपदके पटकावली आहे. मनस्वीला आत्तापर्यंत ३८ गोल्ड मेडल, ५ सिल्व्हर मेडल व ५ ब्राँझ मेडलसह स्केटिंग मध्ये १४ वेळा बुक ऑफ रेकॉर्ड व गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये मनस्वीची नोंद झालेली आहे.
मनस्वीने अवघ्या एका वर्षात स्केटिंग या खेळातून केलेल्या उत्कृष्ट कामगिरी करिता तिला मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद भारत यांच्यातर्फे सुवर्ण लक्ष नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड तसेच मास्टर चंदगीराम राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. संपूर्ण भारतातून १५२ खेळाडूंना पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये मनस्वी वयाने सर्वात लहान होती, हे विशेष. याशिवाय तिची महाराष्ट्र खेल पुरस्कार करिता निवड देखील झालेली आहे.
फायर गर्ल, गोल्डन गर्ल, जागतिक विक्रमवीर, इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट.
मनस्वीला आतापर्यंत मिळालेले पुरस्कार…
● ५० मीटर लांब फायर लिंबो स्केटिंग करणारी जगातील पहिली ५ वर्षाची मुलगी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर. ● १६ बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर. ● सुवर्णलक्ष नॅशनल स्पोर्ट अवॉर्ड प्राप्त. ● मास्टर चंदगीराम राज्य क्रीडा पुरस्कार. ● राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार २०२३. ● भैरवी महिला समाजरत्न पुरस्कार २०२२ ● राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार २०२२ ● कोंढवा भूषण पुरस्कार २०२२ ● गुणगौरव विशेष पुरस्कार २०२२ ● १ इंटरनॅशनल, ७ नॅशनल, ८ स्टेट लेवल आणि ३१ जिल्हास्तरीय स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये यश ● ६० गोल्ड मेडल्स, ७ सिल्वर मेडल्स आणि ८ ब्राँझ मेडल्स. ● पुणे ते बारामती १०२ किमी रिले स्केटिंग मध्ये सहभाग. ● 81 Hrs नॉन स्टॉप रिले स्केटिंग मध्ये सहभाग. ● 96 Hrs रिले स्केटिंग मध्ये सहभाग. ● मालदीव येथे भारत देशासाठी 3 सुवर्ण पदके मिळविले. ● ६३ पेक्षा जास्त मान्यवरांकडून सन्मानित |