गावचा ग्रामसेवक, गेला संपावर !


● गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन…
● ग्रामसेवक राज्यव्यापी बेमुदत संपावर

वणी : राजू निमसटकर

जुनी पेन्शन लागू करा या हक्काच्या मागणीला पुढे करीत अगदी सातत्यपूर्ण मागणीचा रेटा लावून धरणाऱ्या आणि सरकारला अगदी नाकी नऊ आणणाऱ्या, राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीने, राज्य सरकारचे विरोधात पुकारलेल्या असहकार आंदोलनात, आता आम्हीही सहभागी म्हणत गावचा ग्रामसेवक देखील आजपासून बेमुदत संपावर गेला आहे.

याच आंदोलनाचा निर्णायक भाग म्हणजे, दि. १४ मार्च २०२३ ला आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्व संघटनांनी आंदोलनातील महत्त्वपूर्ण अशा असहकाराचे माध्यमातून बेमुदत संप पुकारून निर्णायक आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. संघटनांचे वतीने छेडलेल्या आंदोलनाला, संपाला सर्वच स्तरातून चौफेर पाठिंबा मिळत असतानाच, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, समन्वय समितीची घटक संघटना असल्याने ग्रामसेवक संघटना सुद्धा बेमुदत संपात सक्रीय सहभागी होत आहे असे म्हणत, गावचा ग्रामसेवक देखील आजपासून संपावर गेला आहे.

राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र तथा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांनी दिलेल्या १४ मार्च २०२३ पासूनच्या बेमुदत संपात आम्ही सहभागी होत आहे. अशा आशयाचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन ग्रामसेवक संघटनेने देखील आजपासून संपात उडी घेतली आहे.


महाराष्ट्र राज्यातील दि १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्याना १९८२ व १९८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करा. या मागणीला घेऊन राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर आंदोलने होत आहेत.

नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment