आता…
मतदारसंघाच्या विकासाला मिळेल गती !


● वणी विधानसभा मतदारसंघाने घडवला इतिहास
● आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नाला यश
● स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच, एका वर्षांत विकासासाठी आणले तब्बल २०० कोटी रुपये
● तर… अर्थसंकल्पातूनही आणला १०० कोटीच्या वर विकास निधी खेचुन

वणी : राजू निमसटकर

सत्ता परिवर्तनानंतर एक वर्षात तब्बल २०० कोटीचा निधी वणी विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी आणण्यात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना यश आले आहे. वणी विधानसभा क्षेत्रासाठी एका वर्षात राज्य शासनाकडून एवढा मोठा निधी इतिहासात पहिल्यांदाच मिळाला. पुढील वर्षात रस्ते विकासासाठी किमान ९०० कोटींचा निधी आणू असा निर्धार, वणी येथील विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत वणी विधानसभा मतदार संघाचे विकास पुरुष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी व्यक्त केला आहे.

वणी विधानसभा मतदार संघाचा महाविकास आघाडी शासनाच्या काळात ठप्प पडलेला विकास आता युती शासनाच्या काळात भरधाव वेगाने होणार आहे. यामध्ये सिंचन, आरोग्य आणि ग्रामीण दळणवळण ह्या महत्वपूर्ण मूलभूत गरजांचा देखील समावेश असून, त्यासाठी लागणारा विकास निधी खेचून आणू व मतदार संघाचा सर्वांगीण विकास घडवू असा शब्द आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका करीत पत्रकार परिषदेत दिला.

वणी विधानसभा क्षेत्रातील…
राज्य महामार्गांच्या विकासासाठी ४७ कोटी रुपये
जिल्हा अंतर्गत रस्त्यासाठी ४.१० कोटी रुपये
ग्रामीण रस्ते विकासासाठी २४.६० कोटी रुपये
जनजाती क्षेत्र उपाययोजने अंतर्गत आदिवासी भागासाठी १०.९६ कोटी रुपये
जमीन अधिग्रहण करण्यासाठी ७ कोटी
सामाजिक न्याय विभागा अंतर्गत ग्रामीण दलित वस्ती विकासासाठी ४ कोटी रुपये
२५/१५ अंतर्गत ग्रामीण भागासाठी ५ कोटी
वणी तालुक्यातील श्री जगन्नाथ बाबा तिर्थक्षेत्र भांदेवाडा करिता २ कोटी रु.
जैताई देवस्थान वणी करिता १ कोटी रु.
रंगनाथस्वामी देवस्थान वणी करिता १ कोटी रु. व
गोडगाव देवी देवस्थान करिता १ कोटी रु. असे देवस्थानच्या विकासासाठी एकुण ५ कोटी रुपये निधी मंजुर झाला आहे.

अशाप्रकारे वणी विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी एकूण १०० कोटी रुपये या अर्थसंकल्पातुन आणण्यात वणी विधानसभा क्षेत्राच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना यश मिळाले आहे.

युती शासनाच्या काळातील मागील हिवाळी अधिवेशनात…
वणी शहराच्या सिमेंट रस्त्यासाठी १५ कोटी रुपये
२५/१५ अंतर्गत ग्रामीण भागासाठी ५ कोटी
वणी- ढाकोरी रस्ता, मोहदा- टुडा रस्ता, खैरी-वडकी कडे जाणारा रस्ता, पाटण झरी, माथार्जुन- सुरदापुर, झरी-पाटण, अडेगाव-खातेरा, गणेशपुर-कोसरा, मारेगाव मार्डी या रस्त्यासाठी ८० कोटी रुपये आणले होते. या निधीची कामे प्रत्यक्षात सुरू झाली आहेत.

घोन्सा शिबला मार्गाने केळापुर-पारवा कडे जाणारा मार्ग, वणी नांदेपेरा-मार्डी- खैरी-वडकी कडे जाणारा मार्ग, चारगाव-शिंदोला पासून चंद्रपूरच्या सीमेपर्यंतचा रोड, रासा बोर्डा करणवाडी-कुंभा खैरी पर्यन्तच्या प्रस्तावित रस्त्याच्या कामाच्या सर्वेक्षणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या मार्गासाठी फार मोठया प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. अशी माहिती या विधानसभा क्षेत्राचे विकास पुरुष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिली.

विशेष म्हणजे, पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना संपूर्ण आत्मविश्वासाने आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी उत्तरे दिलीत. वणी विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास युती शासनाच्या काळात नक्कीच करू असा प्रबळ आत्मविश्वास पत्रकार परिषदेत बोलताना आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे मध्ये दिसून येत होता. आयोजित पत्रकार परिषदेला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचेसह दिनकर पावडे, विजय पिदुरकर, तारेंद्र बोर्डे, गजानन विधाते, श्रीकांत पोटदुखे यांचे सह संजय पिंपळशेंडे यांची विशेष उपस्थिती होती.


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment