वेदनादायी…
शेवटी, जीवनाच्या शर्यतीत तो हरलाच !


● गव्हाचे पीक वाचवितांना घडला अनर्थ
● आगीच्या वणव्याने घेतला बळीराजाचा बळी
● हृदय पीळवटून टाकणारी घटना सर्वत्र शोककळा

वणी : राजू निमसटकर

चालु शेत पिकाचा हंगाम संपत नाही तोच, पुढच्या शेतीच्या हंगामाची लगबग बळीराजाची असते. पुढील हंगामात तरी चांगले पीक येईल आणि कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करता येईल. अशी भाबळी आशा बाळगलेला बळीराजा ऊन-वारा-पाऊस या संपूर्ण ऋतूत शेतीतच कसतो, राबतो आणि तिथेच संपतो देखील. हेच वणी तालुक्याच्या उमरी येथील महादेव माथनकर या वयोवृद्ध बळीराजाच्या दुर्दैवी मृत्यू ने पुढे आले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेल्या बळीराजा शेतकऱ्यांच जगणं हे किती भयावह असते हेच या घटनेवरून अधोरेखित होतयं.

वणी मुकुटबन मार्गावरील उमरी हे लहानस गाव. येथीलच वयोवृद्ध बळीराजा शेतकरी महादेव माथनकर आपल्या कुटुंबाचे पालनपोषण केवळ शेतीच्या भरोश्यावर कसे बसे करीत असे. मोठ्या परिश्रमांने गव्हाचे पीक घेतले, त्याची कापणी झाली आणि उभनही लावली होती. केवळ क्रेशर लावून घरी गहू घेऊन जायचे एवढेच बाकी राहिले होते.

नेहमीप्रमाणे बैल घेऊन महादेव पाटील शेतात आले आणि शेतीच्या कामाला लागलेत. शेताच्या धु-यावर असलेला काळी कचरा पेटवीला. दुपारची ऊन असल्याने आणि कचरा वाळला असल्याने शेताच्या धु-याने (बांधाने) आगीचे रौद्ररूप धारण केले. पाहता पाहता बांध जळायला लागला. गव्हाच्या पिकाची उभंण बांधाच्या अगदी शेजारीच होती. कचऱ्याच्या आगीने शेतातील गव्हाचे पीक पेटू नये म्हणून, वयोवृद्ध बळीराजा भर उन्हात धुऱ्यावरची आग विजविण्याचा जीवांच्या आकांताने प्रयत्न करीत होता. जवळच असलेल्या विहिरीवर जाऊन मोटारही सुरू केली. हातात असलेल्या पाण्याच्या डबकीने पाणीही मारले. धावाधाव केली, आणि शेवटी आगीवर नियंत्रण मिळविले आणि आग वीजवलीच. मात्र, म्हातार शरीर थकल होत, दमल होत. आग वीजवताना त्याला भोवळ आली तो खाली कोसळला, तो कायमचाच.

सायंकाळ झाली शेतातुन बैल घरी परतले परंतु महादेव पाटील घरी आलेच नाही म्हणून शोध सुरु झाला. तिकडे महादेव पाटील मात्र शेतातच निपचीत पडले होते, त्यांचा दुर्दैवी अंत झाला होता.
राब राब राबून परिश्रमानं पिकवलेलं गव्हाचे पीक वाचवण्यात, बळीराजा यशस्वी झाला होता खरा. मात्र, जीवनाच्या शर्यतीत तो हरला अपयशी ठरला. ही दुर्दैवी घटना घडली १० मार्चचे दुपारी उमरी येथील अभागी बळीराजा महादेव माथनकर यांच्या शेतात. या दुर्दैवी मृत्यूची वार्ता संपूर्ण पंक्रोशीत पसरली आणी बळीराजाच्या अशा दुर्दैवी अंताने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.


तंत्रज्ञानाने भलीमोठी प्रगती केली असे आपण म्हणतो. देश आधुनिक जगाच्या वाटेवर आहे, अशाही थापा आपण मारतोय. मग एका दाण्याचे हजार दाणे करणारा जगाचा पोशिंदा, त्याच्या जीवनात आपण कधी आधुनिकता आणणार आहोत. त्याला कधी आपण आधुनिक शेतीकडे वळवणार आहोत. त्यासाठी आपण आणखी किती महादेव सारख्या हातबल बळीराजाचा बळी देण्यासाठीची वाट बघणार आहोत. हा कधीतरी प्रश्न समाजमन जगणाऱ्या समाजाला आणि सरकारला पडेल, म्हणजे आम्ही धन्य झालोत.
येऊ द्या जाग,
होऊ द्या जागरण,
मायबाप बळीराजासाठी…
शेतकरी वाचला तर देश वाचेल !

नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

1 thought on “वेदनादायी…<br>शेवटी, जीवनाच्या शर्यतीत तो हरलाच !”

  1. सर बातमी मन सुन्न करणारी होती घटनेची गंभीरता व यंत्रनेतील भ्रम निरास खूप चांगल्या पद्धतीने मांडला

    Reply

Leave a Comment