गोदावरी अर्बनचा विधायक उपक्रम !


कर्तुत्ववान महिलांचा केला सन्मान
जागतिक महिला दिनाचे औचित्य
मुकुटबन शाखेचे अभिनंदनीय पाऊल

वणी : राजू कांबळे

सहकार क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या गोदावरी अर्बनच्या वतीने यंदा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ ते ११ मार्च दरम्यान विशेष सप्ताहाचे आयोजन करून वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या समाजातील कर्तृत्वान महिलांचा उचित सन्मान केला आहे.

गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील,अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर सर यांच्या नियोजनाखाली कार्यक्षेत्रातील पाचही राज्यात महिला दिनाच्या निमित्ताने महिला सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

त्याच अनुषंगाने मुकुटबन शाखेच्या वतीने मुकुटबन या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असण्याऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले. प्रविणा वसंतराव उदकवार, ललिता कृष्णराव उत्तवार, प्रणीता कुंदन पावशेकर, मनिषा भानुदास सगर, ममता नेताजी पारखी, सुरेखा मनोज बडोदेकर, सुष्मा अखिल बरशेट्टीवार, कल्पना मनिरामसींग पवार, शारदा नरसिमलु मंदुलवार, प्रियंका भैयाजी धोंगडे, संगीता विक्रम आसुटकर, छाया सुरेश गडेवार, दिप्ती मोहन मल्लुरवार, सुरेखा संजय आगुलवार, या कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी शाखेचे शाखा अधिकारी धम्मपाल निमसरकार, उपव्यवस्थापक दिप्ती मल्लूरवार सहायक अधिकारी चेतन ठाकरे, रवींद्र तावाडे, राहुल पडलवार, व्यकंटेश झोडे, विपीन गावंडे, दैनिक प्रतिनिधी उपस्थित होते.

सद्यस्थितीत सर्वच क्षेत्रात महिला पुरुषाच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. असं एकही क्षेत्र नाही कि,ज्यात महिलांचा सहभाग नाही. त्यामुळे महिला अबला आहे. तिने केवळ चूल आणि मूल सांभाळावे हि संकल्पना आता लोप पावत आहे. ती चूल-मूल आणि आपले काम या सर्वच कामात अग्रेसर ठरते आहे.


समाजात अनेक स्त्रिया आहेत ज्या आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत काम करीत असतात. सैनिक, वैमानिक, डॉक्टर, वकील, शिक्षक, अभियंता, प्राध्यापक, समाजसेविका यासह अनेक नामवंत क्षेत्रात महिला कर्तृत्व गाजवत आहेत. अनेक महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून घरगुती उद्योग सुरु करून अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम झाल्या आहेत. महिलांचे सक्षमीकरण म्हणजे काय हे यावरून दिसून येते .

महिलांच्या याच कार्यामुळे त्यांच्या कुटुंबाला तर फायदा होतोच सोबतच समाजाला सुद्धा याचा फायदा होऊन परिवर्तनाची दिशा मिळते. अश्याच कर्तृत्वान महिलांच्या कार्याची दखल घेत त्यांचा यथोचित सन्मान झाला पाहिजे या उद्देशाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ ते ११ मार्च दरम्यान विशेष सप्ताहाचे आयोजन केले आहे .यामध्ये समाजातील अश्या कर्तृत्वान महिलांची निवड करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment