शेतकऱ्यांच्या हक्काचा
“वसंत” फुलणार – मा.आशिष खूलसंगे


तिन्ही तालुक्यात अद्ययावत वाचनालयाचे होणार निर्माण
शेतकरी मंदिरासह लॉनमध्ये मिळणार सूट
● बंद जिनिंग चालू करण्याचा मानस

वणी : राजू निमसटकर

विभागातील बळीराजा शेतकऱ्यांच्या हक्काची संस्था म्हणून समजल्या जाणा-या दि वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीला पूर्वीचे गतवैभव प्राप्त व्हावे या मुख्य हेतूने, शासन दरबारी नवनवीन विकासशील धोरणांचा पाठपुरावा करीत, कर्जात बुडालेल्या संस्थेचा वसंत फुलविण्यासाठी विद्यमान अध्यक्षाने कंबर कसली असून, बळीराजाच्या संस्थेत बळीराजाचा तितकाच हक्क असावा यासाठीचे पाऊल देखील टाकले जाणार असल्याचे सुतोवाच, विद्यमान अध्यक्ष आशिष खूलसंगे यांचे सह संचालकांनी पत्रकार परिषदेतून केले.

शुक्रवार दिनांक १० मार्चला वणी शहराच्या दि वसंत जिनिंगच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दि वसंत जिनिंगचे अध्यक्ष मा.आशिष खूलसंगे बोलत होते. यावेळी त्यांचे सोबत नवनिर्वाचित संचालक मंडळ देखील प्रामुख्याने उपस्थित होते.

संस्थेच्या मालकी हक्काच्या वणी, मारेगाव आणि झरी-जामणी तालुक्यातील दि वसंत जिनिंगच्या तिन्ही कार्यालयातील सभागृहात अद्ययावत वाचनालयाचे निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती मा.आशिष खूलसंगे यांनी यावेळी दिली. यासोबतच दि वसंत जिनिंगच्या शेतकरी मंदिर व लॉनच्या भाड्यात बळीराजा शेतकऱ्यांना सातबारा दाखवून, एकूण रकमेच्या १० टक्के सूट देण्यात येणार असल्याचेही पत्रकार परिषदेत आशिष खूलसंगे यांनी सांगितले.

डबघाईत आलेल्या दि वसंत जिनिंगला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी, शेतकरी मंदीर सभागृहासह लॅानचे नुतनिकरण करुन, दर्जेदार सुविधेसह कमीत-कमी भाडेतत्वावर देण्यात येणार असल्याचेही खूलसंगे यावेळी म्हणाले. सोबतच दि.वसंत जिनिंगच्या मालकीचे असलेले व बंद पडलेले जिनिंग देखील लवकरात लवकर सुरु करण्यात येणार असल्याचेही आशिष खुलसंगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पत्रकार परिषदेला दि.वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे, उपाध्यक्ष – जयकुमार आबड, शंकर वऱ्हाटे, संजय खाडे, पुरुषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर, अशोक धोबे, रविंद्र धानोरकर, प्रशांत गोहोकार, घनश्याम पावडे, विनोद गोडे, राजेंद्र कोरडे, साधनाताई गोहोकार, शारदाताई ठाकरे, प्रकाश मॅकलवार, भुमारेड्डी भामलवार यांचे सह संचालक मंडळ उपस्थित होते.


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

1 thought on “शेतकऱ्यांच्या हक्काचा<br>“वसंत” फुलणार – मा.आशिष खूलसंगे”

  1. अध्यक्ष आणि संचालक मंडळाला सदिच्छा ! तसेच संस्थेच्या सभासद बळीराजाला संस्थेचे बळ मिळो आणि त्याच्या आयुष्यात वसंत फुलवावा ही संचालक मंडळ चरणी प्रार्थना . यापूर्वीच्या संचालक मंडळाला संस्थेने भरपूर आर्थिक बळ दिलेले आहे ;ही बाब लपून राहिलेली नाही .

    Reply

Leave a Comment