मा. राजू उंबरकरांचे नेतृत्वात,
शिवजयंती उत्सव होणार साजरा
वणी : राजू निमसटकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार १० मार्चला वणी शहराच्या शिवतीर्थावर मनसे स्टाईल विविध कार्यक्रमाने साजरी केली जाणार आहे. याची धडाकेबाज तयारी, यावर्षी शिवतीर्थावर आकर्षक गडकिल्ल्यांच्या देखावा व भव्य दिव्य अशा रोशनाईने करण्यात आली आहे.
छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर फुलांची उधळण आणि फटाक्याच्या आतिषबाजीसह शिवजयंतीचा सोहळा साजरा केला जाणार आहे. हा शिवजन्मोत्सवाचा सोहळा वणीकरांसाठी चिरकाल स्मरणात राहील, अशीच जय्यत तयारी शिवतीर्थावर करण्यात आली आहे.
सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनी २१ पुजाऱ्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक सोहळा संपन्न होणार असून, दुपारी ४ वाजता शहरातून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित बाईक रॅलीमध्ये वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्त्यांसह युवक सहभागी होणार असून शिवतीर्थावरच रॅलीचा समारोप देखील होणार आहे.
संध्याकाळी ६ वाजता शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णा कृती पुतळ्याचे पूजन केले जाणार असून पूजना नंतर शिवतीर्थावर उभारण्यात आलेल्या आकर्षक गड किल्ल्याच्या देखाव्याचे मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
ढोल ताशाच्या गजरात, फटाक्याच्या आतिषबाजी सह विद्युत रोषणाई , लेजर शो द्वारा, वणी शहराच्या शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कायम स्मरणात राहील असा अविस्मरणीय रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
“प्रत्येकाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतेयं गडकिल्ल्यांची आकर्षक प्रतिकृती” रयतेचे राजे छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाचे निमित्ताने मनसेच्या वतीने शहराच्या शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. ही भव्य दिव्य, देखणी, अन आकर्षक अशी प्रतिकृती सध्या वणीकरांच्याच नव्हे तर बघणाऱ्या प्रत्येकाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू झाली आहे. मागील आठवड्यापूर्वीपासून अथक परिश्रमाने गडकिल्ल्यांचे निर्माण केल्या जात आहे. तिथीनुसार शिवजन्मोत्सवाचे पूर्वसंध्येला या मार्गावरून जाणारी प्रत्येक व्यक्ती हा देखणा, आकर्षक, भव्य दिव्य आणि लक्ष वेधून घेणारा शिवरायांच्या गडकिल्ल्यांचा देखावा बघताच थांबल्याशिवाय राहत नाही. या भव्य दिव्य अशा गडकिल्ल्यांचीच नव्हे तर मनसेच्या या अभूतपूर्व सोहळ्याची संपूर्ण विभागात चांगलीच चर्चा आहे. |