रिलायंन्स जिओ फायबर फास्ट नेटवर्कची मिळणार सुविधा…
वणी – राजू निमसटकर
एका फास्ट माणसाच्या हाती फास्ट नेटवर्कचे काम आले. आम्ही समाधानी आहोत. कुठल्याही तक्रारी शिवाय आम्हाला फास्ट नेटवर्कची सुविधा मिळेल. असे स्पष्ट मत, रिलायंन्स जिओ फायबर नेटवर्कच्या उदघाट्न सोहळ्या प्रसंगी मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी काढले. गणेशपूर छोरीया लेआउटच्या हनुमान मंदिर परिसरात आयोजित सोहळ्यात उंबरकर बोलत होते.
आयोजित उद्घाटन सोहळ्याला जिओचे अमरावती विभाग प्रमुख अजित शेलार, जिओ वणी विभागाचे जेसीएम अविनाश शर्मा, गणेशपुर ग्रा.पं. चे उपसरपंच प्रशांत खारकर यांचीही विशेष उपस्थिती होती.
अनलिमिटेड फास्ट नेटवर्कची मागणी लक्षात घेता, रिलायंन्स जिओने फायबरचे जाळे पसरविले आणी आता याच माध्यमातून वणी विभागातील जनतेला अनलिमिटेड फास्ट नेटवर्क जिओ फायबरच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, वणी विभागात अत्यंत मोठ्या परिश्रमाने जिओ फायबर नेटवर्क चे निर्माण झाले. आता लवकरच आपल्या सर्वांना जिओ फायबर नेटवर्कच्या माध्यमातून. थेट आपल्या घरापर्यंत 5G नेटवर्कची सुविधा मिळणार आहे अशी माहिती जिओचे अमरावती विभाग प्रमुख अजित शेलार यांनी उद्घाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना दीली.
जिओ फायबर फास्ट नेटवर्कच्या सुविधेसाठी – कनेक्शन साठी, संकेत केबलचे संचालक सुनील जीवने – ९४२२१६५३८३ यांचे सह भरत जयस्वाल – ९८८१०१२४७५ यांचेशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन, जिओ फायबर नेटवर्कच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये कंपनी अधिकाऱ्यांसह जिओ वणी विभागाचे जेसीएम अविनाश शर्मा यांनी केले.
वर्क फ्रॉम होम साठी, जिओ फायबर फास्ट नेटवर्क महत्त्वाचा टप्पा असून विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन क्लासेस बरोबरच, वेगवेगळ्या क्षेत्रातील वाढत्या नेटवर्कची गरज लक्षात घेता, अनलिमिटेड आणि फास्ट नेटवर्क साठी जिओ फायबर उपयोगात येणार. अविनाश शर्मा जेसीएम जिओ वणी विभाग |