🔸व्हॉइस ऑफ डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे करणार उद्घाटन. 🔸पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गज देवेंद्र गावंडे यांचे सह शैलेश पांडे मान्यवरांची असणार उपस्थिती. 🔸मा.खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे सह राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर विशेष अतिथी म्हणून राहणार उपस्थिती. 🔸वसंत जिनिंग सभागृहात दुपारी ठीक १२ वाजता पार पडणार पत्रकार संघटनेचा उद्घाटन सोहळा. 🔸पहिल्या दिवशीच्या कार्यशाळेत शेकडो पत्रकारांची उपस्थिती. 🔸ऍड.कल्याण कुमार आणि निर्भीड पत्रकार तथा फर्डा वक्ता दीपक रंगारी यांनी गजविली कार्यशाळा. |
वणी : राजू कांबळे ( विभागीय प्रतिनिधी )
पत्रकारितेची बदललेली माध्यमे बदलत्या जगासमोर जशी आव्हान म्हणून उभी ठाकली आहे. तशीच ती पत्रकारितेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. हिच बदललेली माध्यमे आणी शासन प्रशासनाची भूमिका स्पष्टपणे पत्रकारांना संघटितपणे समजून घेता यावी म्हणून, वणी उपविभागात “व्हॉइस ऑफ डिजिटल मीडीया” पत्रकार संघटना निर्माण झाली. याच पत्रकार संघटनेचा उद्घाटन सोहळा राज्याचे माहिती आयुक्त मा. राहुल पांडे यांचे हस्ते वणीच्या भूमीत आज 26 फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता दि. वसंत जिनिंग वणीचे सभागृहात संपन्न होत आहे.
विशेष म्हणजे, उद्घाटन सोहळ्याला लोकसत्ताचे संपादक, प्रसिद्ध विचारवंत, व्याख्याते मा. देवेंद्र गावंडे उद्घाटक वक्ते आहेत. तर तरुण भारत डिजिटल मीडियाचे संपादक मा. शैलेश पांडे यांचे अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. विशेष अतिथी म्हणून चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघाचे खासदार मा. बाळूभाऊ धानोरकर, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराज अहीर, वणी विधानसभा मतदार संघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष मा. राजू उंबरकर, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य मा. विजयबाबू चोरडिया, दि वसंत जिनिंग वणीचे अध्यक्ष मा.आशिष खूलसंगे यांची उद्घाटन सोहळ्याला विशेष उपस्थिती असणार आहे.
पत्रकारितेची बदललेली माध्यमे आणी शासन प्रशासनाची भूमिका स्पष्टपणे पत्रकारांना संघटितपणे समजून घेता यावी म्हणून,आयोजित उद्घघाटन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष राजू निमसटकर यांनी केले आहे.
उद्घाटन सोहळ्याचा पहिला दिवस गाजवला कार्यशाळेने वणी शहराच्या इतिहासात प्रथमच पत्रकारांसाठीची कार्यशाळा गाजली. प्रसिद्ध विधीज्ञ ऍड.कल्याण कुमार यांनी डिजिटल मीडिया आणि कायदा या विषयाला न्याय देत असतानाच, कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या.तर संपूर्ण विदर्भात निर्भीड पत्रकार आणि फर्डा वक्ता म्हणून ज्यांचा परिचय आहे. असे ते, दीपक रंगारी यांनी मराठी भाषा प्रमाण व्याकरण आणि प्रसार माध्यमे, या विषयाला न्याय देत असतानाच, उपस्थितांना तब्बल पाच तास पर्यंत खीळवून ठेवले. एकूणच काय तर नव्याने निर्माण झालेल्या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून घेतल्या गेलेली कार्यशाळा भाव खावून गेली. |