भक्तीमय सोहळ्याला लाभली सामाजिकतेची झालंर…


  • श्री. स्वामी नरेंद्र महाराज पादुका दर्शन सोहळ्यात, ११ गरजू महिलांना केले शिलाई मशीनचे वाटप…
  •  रंगनाथस्वामी अर्बन निधी लि.वणीचे अध्यक्ष संजय खाडे यांचेकडून गरजू महिलांना शिलाई मशिनची भेट.
  •  खा.बाळूभाऊ धानोरकर यांची विशेष उपस्थिती…

वणी : राजू निमसटकर

वणी शहराला लाभलेल्या भक्तिमय परंपरेतील सामाजिक दायित्वाचा पुन्हा एकदा प्रत्येक आला तो, श्री.स्वामी नरेंद्र महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळाचे निमित्याने ( दिनांक १२ नोव्हेंबर ) वणी शहराचे एस. बी. लॉन मधील भव्य सोहळयात. विशेष म्हणजे याही भक्तीमय सोहळ्याला झालंर होती ती सामाजिक कार्याची. याच सामाजिक कार्याचे कौतुक केले हजारोंच्या संख्येने सोहळ्याला उपस्थित असलेल्या गाव खेड्यातील भक्तगणांनी, सामाजिक कार्याची स्तुती करून.

सामाजिक कार्यात हीरहिरीने सहभागी होत असलेले काँग्रेस पक्षाचे निष्ठावान, श्री रंगनाथ स्वामी अर्बन निधी ली. वणीचे अध्यक्ष संजय खाडे यांनी याच भक्तिमय सोहळ्यात आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या ग्रामीण भागातील अकरा होतकरू गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्याचा मानस आयोजकांकडे व्यक्त केला. भक्तिमय सोहळ्याला सामाजिकतेची झालर लाभलेली वणीची परंपरा आयोजकाने पुढे कायम ठेवत, आयोजित सोहळ्यात संजय खाडे यांचे दातृत्वाला पुढे करीत शिलाई मशीन चा वाटप सोहळा आयोजित केला.

आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या गरजू महिलांसाठी ६० हजार ५०० रूपये किंमतीच्या ११ शिलाई मशिनचे वाटप खा. बाळूभाऊ धानोरकर यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रासंगी वणी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार वामनराव कासावार, वसंत जिनींगचे माजी अध्यक्ष देविदास काळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस रवि बेलूरकर, यांचेसह मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती होती.

वणी शहराचे एस. बी. लॉन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या श्री.स्वामी नरेंद्र महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळाला हजारोंच्या संख्येने परिसरातील भाविकभक्तानी आपली उपस्थिती दर्शविली होती. विशेष म्हणजे, भक्तिमय सोहळ्याला सामाजिकतेची झालंर लाभल्याने भक्तीमय सोहळा अधिक भक्तीमय झाला होता.


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment