वणीत भारत जोडो यात्रेला उदंड प्रतिसाद…


यापेक्षा… इंग्रजांची राजवट बरी होती.
न्यायव्यवस्था केंद्र सरकारची गुलाम.
खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची केंद्र सरकारवर घनाघाती टीका…

वणी : राजू कांबळे ( विशेष प्रतिनिधी )

काश्मीर ते कन्याकुमारी पासून निघालेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रतिसाद लाभावा, विभागातील कार्यकर्ता भारत जोडो पदयात्रेत सहभागी व्हावा यासाठी, वणी शहराचे आराध्य दैवत श्री रंगनाथ स्वामी देवस्थानातून काँग्रेसच्या वतीने भारत जोडो मोटर सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. खा. बाळूभाऊ धानोरकर यांचे नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो मोटरसायकल यात्रेला काँग्रेस कार्यकर्त्यांसह समर्थकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संपूर्ण देश महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचाराबरोबरच जाती-जातीत द्वेष पसरविणाऱ्या धर्मांध शक्तीच्या वणव्यात पेटतो आहे. याला खतपाणी घालण्याचं काम देशात केंद्रात सत्तेत असणाऱ्यांकडून होत आहे. देशात एक प्रकारची हुकूमशाही निर्माण करू पाहणार केंद्र सरकार, संविधान विरोधी भूमिका घेत, संपूर्ण जगात आदराने बघितल्या जाणाऱ्या लोकशाहीला संपवु पहाते आहे. देशाचे संविधान धोक्यात आले आहे. एकूणच काय तर केंद्रात सत्तेत असलेलं भाजपचं सरकार, संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा निर्माण झालेला देश तोडू पाहत आहे. देशाचं सार्वभौमत्व, देशाची अखंडता आणि एकता धोक्यात आनत आहे. अशी घनाघाती टीका, वणी शहरात निघालेल्या भारत जोडो मोटर सायकल यात्रेचे वेळी खा. बाळूभाऊ धानोरकर यांनी माध्यमांशी बोलताना केंद्र सरकारवर केली आहे.

या देश विघातक शक्तीपासून भारत देशाला वाचविण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो ही संकल्पना पुढे आणत संपूर्ण भारत परिक्रमा करण्याचा प्रण केला आहे. या भारत जोडो यात्रेमध्ये सुरुवाती पासूनच प्रचंड संख्येने जनमानस जोडल्या जात आहे.
काश्मीर ते कन्याकुमारी पासून सुरू झालेली ही भारत जोडो यात्रा मजल दर मजल करीत पुरोगामी महाराष्ट्राच्या भूमीत आलेली आहे.

याच भारत जोडो यात्रेमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षासह इतरही समविचारी राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते तथा सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत आहे.
देशाची अखंडता आणि एकता राखण्याबरोबरच एकसंघ देशाची लोकशाही वाचविणयासाठी भारतीय संविधानाला वाचविले पाहिजे, यासाठी आदरणीय राहुल गांधी यांचे नेतृत्वातील भारत जोडो पदयात्रेत देशासह राज्यातील तमाम जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चंद्रपूर वणी आर्णि लोकसभा मतदार संघाचे खा. बाळूभाऊ धानोरकर यांनी केले आहे.

वणी शहरात निघालेल्या भारत जोडो यात्रेमध्ये खा. बाळूभाऊ धानोरकर यांचे सह माजी आमदार वामनराव कासावार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे, रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष एड. देविदास काळे, लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे अध्यक्ष संजय खाडे, जिल्हा काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष इजहार शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य आशिष खुलसंगे, प्रमोद वासेकर, प्रमोद निकुरे, पलाश बोढे यांचे सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ता उपस्थित होता…

 

लाठी-गोठी खायेंगे देश को बचायेंगे


भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या १९७७ – ७८ चे काळात लाठी-गोठी खायेंगे इंदिरा गांधी को लायेंगे, अशी भूमिका घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांसह संपूर्ण देश रस्त्यावरती उतरला होता. तीच स्थिती आज आपल्यावरती आली असल्यामुळे, आता आपल्याला आपले संविधान, आपला देश वाचविण्यासाठी राहुलजी गांधी यांचे नेतृत्वातील भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी व्हायचे आहे. असे आवाहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले…

खा.बाळूभाऊ धानोरकर
चंद्रपूर-वणी-आर्णि लोकसभा मतदार संघ


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment