वाघाने केली तरुण शेतकऱ्याची शिकार…


  • वणी तालुक्याचे भुरकी (रांगना) शेत शिवारातील घटना…
  • घटनास्थळी तणावाचे वातावरण.
  • शवविच्छेदन झालेला मृतदेह  हलविण्यास गावकऱ्यांचा नाकार…

वणी : राजू निमसटकर
वणी तालुक्यातील अनेक गावच्या शेत शिवारात हल्ली वाघाची दहशत असून, कुठे पाळीव जनावरांची तर कुठे माणसांची वाघाने शिकार केल्याची घटना आहे. भुरकी (रांगना) शेत शिवारात एका २२ वर्षीय तरुण बळीराजा शेतकऱ्याची वाघाने शिकार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. अभय मोहन देऊळकर असे अभागी मृतक तरुण बळीराजाचे नाव आहे.

अभय मोहन देऊळकर हा तरुण बळीराजा शेतकरी नेहमीप्रमाणे (१० नोव्हेंबर ला) नदीकाठालगत असलेल्या त्यांचेच मालकीचे भुरकी (रांगना) शेत शिवारातील शेतात गेला होता. नदी काठालगत तो बैल चारत असताना त्याला कुठे माहित होतं, वाघाच्या रूपात त्याचा मृत्यू त्याचा दबा धरून बसलाय म्हणून. काही एक कळण्याच्या आतच अभयवर वाघाने हल्ला चढविला आणि अभयने जीवाचे आकांताने आरडाओरड केली. मेरकरी असलेले भुरकी येथील शेतकरी रामदास आगलावे आणी रांगणा येथील शेतकरी सरपंच प्रकाश बोबडे यांनी अभयची आरडाओरड ऐकली. सरपंच प्रकाश बोबडे यांनी तर वाघ अभय वर हल्ला चढवीत असताना प्रत्यक्ष बघितले. यावेळी जीवाला वाचविण्याच्या ताकदीने बोबडे यांनीही आरडाओरड केली. संपूर्ण शिवारातील बळीराजा शेतकऱ्यांमध्ये एकच कल्लोळ झाला आणी वाघाने तिथून पळ काढला. घाबरलेल्या आणि भीतीच्या वातावरणात आगलावे, बोबडे यांचेसह आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी अभय कडे धाव घेतली, अभयला शोधण्याचा प्रयत्न केला असता वाघाने अभयच्या नरडीचा घोट घेत अभय चा फडश्या पाडला होता.

अभयच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली. रांगणा येथील उपसरपंच कॉम्रेड दिलीप परचाके यांचे सह अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वनविभागासह महसूल प्रशासनाला कळविण्यात आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह महसूल विभागाचे मंडल अधिकारी डांगाळे, तलाठी निकम यांनीही तात्काळ घटनास्थळ गाठले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयामध्ये रवाना करण्याचे ठरले.
यावेळी मात्र घटनास्थळी प्रचंड तणावाचे वातावरण होते. गावकऱ्यांनी प्रेत हलविण्यास नकार देत, वाघास जेरबंद करण्याबरोबरच मृतकाचे कुटुंबीयास तात्काळ आर्थिक मदत द्या व कुटुंबातील एकास वन विभागात नोकरी द्या. या प्रशासनापुढे मागण्या ठेवत गावकऱ्यांनी अभयचा मृतदेह हलविण्यास नकार दिला. शेवटी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सामंजशाची भूमिका घेत गावकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची भूमिका घेतली. आणी गावकऱ्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना केला.

तरच… मृतदेह ताब्यात घेऊ…

काँ. दिलीप परचाके

———————————-

अभय मोहन देऊळकर हा तरुण अल्पभूधारक बळीराजा शेतकरी काबडकष्टाने कुटुंबाचे पालन पोषण करीत होता. अभयच्या जाण्याने कुटुंबाचा आधार हरवला. त्यामुळे, कुटुंबातील एका सदस्यास वनविभागाने नोकरी द्यावी. शासनाने तात्काळ कुटुंबीयास आर्थिक मदत करावी. याबरोबरच वाघास ताबडतोब जेरबंद करावे. या संपूर्ण मागण्याबाबत जोपर्यंत लेखी स्वरूपात मागण्या पूर्ण करण्यात येईल असे सबंधित विभागाकडून लेखी दिल्या जात नाही. तोपर्यंत, शवविच्छेदन झालेल्या प्रेतास आम्ही ग्रामीण रुग्णालयातून हलवू देणार नाही. अशी ठाम भूमिका किसान सभेचे नेते कॉम्रेड दिलीप परचाके, रांगणा सरपंच प्रकाश बोबडे यांनी घेतली.


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment