क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिका म्हणजे शैक्षणिक पाऊलवाटेवरील एक मैलाचा दगड…! |
वणी : राजू निमसटकर
आजचे जग जितके कष्टाचे, धावपळीचे, धकाधकीचे, स्पर्धेचे तितकेच ते भौतिकवादी सुखाच्या विळख्यात जगणाऱ्यांचे देखील आहेचं. हाच खरा तर आजचा वर्तमान आहे. याच वर्तमानावर घाव घालत, “चला समाजाच्या सर्वांगीन उन्नतीसाठी एकत्रितपणे काम करू या आणि पुढच्या पिढीला, विश्वात फुलाप्रमाणे फुलवू या” ह्याचं भारतीय संस्कृतीची उजळणी करीत आणी विद्यादानाच्या मार्गावरील अडथळे दूर करीत, इतिहासात नोंद असलेल्या अनेकांनी, समान तत्वाच्या न्याय हक्कासाठी विधायक कार्यातून सर्वांना समान शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न केले आहे.
याच धर्तीवर समाजसेवी, कुशल व्यवहारी आणी राजकीय क्षेत्रातील वणी विधानसभेचा उमदा चेहरा म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते, ते संजय खाडे यांच्या समाजसेवी दूरदृष्टीच्या कार्यातून, स्पर्धा परीक्षेमध्ये प्रचंड मेहनत करू इच्छिणाऱ्या, मात्र अपुऱ्या सुविधे अभावी जीवनाच्या गाठीशी बांधलेले स्वप्न पूर्ण करू न शकणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांसाठी, संजय खाडे यांनी अभ्यासिकेचे निर्माण केले आहे. हेचं कार्य आता विद्येच्या पाऊलवाटेवरील एक मैलाचा दगड ठरू पाहते आहे. याचं अभ्यासिकेचा उद्घाटन सोहळा, एक सामाजिक चळवळ म्हणून विभागाच्या खासदार माननीय प्रतिभाताई धानोरकर यांचेसह विशेष मान्यवर पाहुण्यांचे उपस्थितीत, वणी शहराचे घरसंसार सेल समोरील जटाशंकर चौक येथे १२ ऑगस्टला सायंकाळी चार वाजता संपन्न होत आहे. उद्घाटनानंतर शेतकरी मंदिर वणी येथे करिअर कॉन्सलर विजय मुसळे यांचे देशविदेशातील शिक्षणाच्या संधी या विषयावर व्याख्यान देखील होणार आहे. विशेष म्हणजे, संजय खाडे फाउंडेशनतर्फे हा उपक्रम राबवला जात असून स्व. रामचंद्र खाडे यांच्या स्मरनार्थ ही अभ्यासिका स्थापन कऱण्यात आली आहे.
संजय खाडे फाऊंडेशन द्वारा संचालित स्मृती शेष रामचंद्र पा. खाडे यांच्या स्मरणार्थ “महात्मा फुले अभ्यासिकेचे उद्घाटन तथा दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा देखील याचं दिवशी दुपारी शेतकरी मंदिर वणी येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.खा. प्रतिभाताई धानोरकर, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.भालचंद्र चोपणे, विशेष अतिथी म्हणून मा. आ. सुधाकर आडबले, आमदार विधान परिषद, मा.वामनराव कासावार माजी आमदार वणी. तर प्रमुख अतिथी म्हणून नरेंद्र पाटील ठाकरे माजी सभापती कृ.उ.बा.स.मारेगाव, रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था वणीचे अध्यक्ष ॲड.देविदास काळे. विजय मुकेवार, अध्यक्ष शि.प्र.मं.वणी. प्रा.दिलीप मालेकर क्रिडा प्रशिक्षक, युवा चेतना क्लब वणी. मा.अरूणाताई खंडाळकर माजी सभापती महिला व बाल कल्याण जि.प.यवतमाळ ईत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आयोजित सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक संजय खाडे जिल्हा सरचिटणीस कॉंग्रेस कमिटी तथा संचालक महाराष्ट्र राज्य पणन महासंघ, मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा – संजय खाडे अनेक विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यासासाठी पोषक वातावरण नसते, सोयी सुविधांचा अभाव असते. त्यामुळे ही अभ्यासिक स्थापन करण्यात आली आहे. उत्तम बैठक व्यवस्था, एसी, ऑनलाईन अभ्यास, सुसज्ज लायब्रेरी व अत्याधुनिक सुविधा अशी या अभ्यासिकेची वैशिष्ट्ये आहेत. याचा विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होईल. संजय खाडे जिल्हा सरचिटणीस काँग्रेस |
भारतीय समाजात गुरु-शिष्य संस्कृतीला पुन्हा अधिक मजबूत करण्यासाठी आणी समाजातील तरुण पिढीला एक चांगला माणूस बनविण्याची वेळ आता तुम्हा आम्हा सर्वांवर आली आहे. म्हणूनच अशा प्रकारच्या अभ्यासिकेची सुरुवात ही सामाजिक चळवळ म्हणून पुढे उभी राहिली पाहिजे. तरचं, समाजाचे उत्थान करू पाहणाऱ्या एका ध्येयवेढ्या समाज सुधारकाच्या मार्गावरील विधायक कार्याचे फलित झाले असे म्हणता येईल.