वणी : राजू निमसटकर
माणसाच्या गरजा न संपणाऱ्या आहेत. एक गरज दुसऱ्या गरजेला जन्म देते. आणि अशा नवनवीन गरजांची पूर्ती करण्याकरता सारेचं धडपडत असतात. यातूनच जन्माला येते ते दुःख आणि कष्ट. याच दुःख आणि कष्टाच्या निवारणासाठी उभ्या आयुष्याची झीज होते. कुणी श्रमरूपी प्रयत्नाच्या पराकाष्ठेतून बाहेर पडतो तर कुणी तिथेच खितपत पडून दीनदुबळे जीवन कंठितो. मात्र याच दीनदुबळ्या गरजवंत जनसामान्यांना पुन्हा एकदा जीवनात स्वाभिमानाने जगण्यासाठी गरज असते ती दूत रूपाने आलेल्या एखाद्या समाजसेवी आधाराची. आणि नेमका हाचं, परिसरातील याच दीनदुबळ्या गरजवंतांचा आधार बनलाय, “दानत्वाचे धनी म्हणून सर्व परिचित असलेले समाजसेवी, विजयबाबू चोरडिया” यांच्या समाजसेवी कार्याचे रूपात.
दृष्टिहीनांचे ठरले देवदूत…
अगदी वयातील उमेदीच्या काळापासून पदोपदी बघितलेलं दीनदुबळ्यांचे दुःख, त्यातूनच मनामध्ये निर्माण झालेली समाजसेवेची आवड. याच समाजसेवी वृत्तीला राजकीय जोड देत प्रवास सुरू झाला तो “समाजसेवी” विजयबाबू चोरडिया या रूपाने. जवळपास तीन दशकाच्या या समाजसेवी जीवनात विविध रूपाने अनेकांच्या जीवनाचा आधार बनलेले समाजसेवी विजयबाबू चोरडिया यांनी शेकडो आरोग्य शिबिराच्या आयोजनाचे माध्यमातून असंख्य व्याधीग्रस्त रुग्णांना आनंदी जीवन बहाल केले. तर त्याहीपेक्षा अधिक अंध-दृष्टीहिनांचा विजयबाबू चोरडिया “दृष्टीदाता” ठरले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, यापुढे त्यांच्या दृष्टीपथास पडणाऱ्या कोणत्याही अंध व्यक्तीस त्याला दृष्टी मिळवून देण्यासाठी पाहिजे ते प्रयत्न करणार असल्याचाही विजयबांबुनी “प्रण” केला आहे, हे विशेष.
अनेकांना दिले जगण्याचे बळ…
अगदी काल-परवापर्यंत आपल्या परिसरातील मार्डी, वणी, पाटण या ठिकाणी घडवून आणलेल्या भव्य आरोग्य व नेत्ररोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे माध्यमातून व्याधीग्रस्त असलेल्या हजारो दीनदुबळ्या गरजवंत रुग्णांना समाजसेवी विजयबाबू चोरडिया यांनी प्रत्यक्ष संपूर्ण खर्चासह रोग निदानापासून तर रोग बरा होईपर्यंतचा असा सर्व खर्च स्वतः स्वेच्छेने करून, पीडित माणसाच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य आणले. यातील अनेक अंध, दृष्टहीनांनाही सर्व सोयींनी सुसज्ज अशा मोठमोठ्या शहरातील नामवंत हॉस्पिटलमध्ये नेत्रशास्त्रक्रियेचाही सर्व खर्च उचलत सर्वांना दृष्टी देण्याचे “पुण्य कर्म” समाजसेवी विजयबाबू चोरडिया यांनी केले. इतकेच नाही तर, कुठलाही स्वार्थ हेतु डोळ्यासमोर न ठेवता असंख्य अशा अपंग, लुळ्या, पांगळ्या, गरजवंतासह आपदग्रस्तांना देखील, कधी रोख रक्कमेच्या भेटीतून तर कधी आवश्यक साहित्याची भेट देत, समाजसेवी विजयबाबुनी मायेचा आधार देत जगण्यास बळ दिले. या सर्व घटना अगदी सर्वांच्या समोर सूर्य प्रकाशा इतक्या लख्ख आहेत.
“विजय”
हा नेहमी सत्याचाचं…
“जीवनात कितीही वाईट प्रसंग येउ द्या,
चांगलं वागणं कधीच सोडू नका,
विजय हा नेहमी सत्याचाच होतो”.
हाच मूलमंत्र घेऊन जगत असलेले समाजसेवी विजयबाबू चोरडिया यांनी समाजकारणाला राजकारणाची जोड देत समाजहित हीच दृष्टी समोर ठेवली आणी याचं सातत्याने सुरू असलेल्या समाजकार्याची पावती पक्षीय स्तरावर मला मिळेल आणि निश्चित स्वरूपात माझा पक्ष म्हणजेच, भारतीय जनता पक्षाचा, महायुतीचा वणी विधानसभेचा अधिकृत उमेदवार म्हणून पक्षातील वरिष्ठ नेते मला उमेदवारी देतीलचं याबाबत मी पूर्णतः आशावादी आहे. जनताही माझ्या समाजकार्याची पावती मला विजयोत्सवाचे रूपाने देईल, असा दृढ विश्वास भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य असलेले समाजसेवी विजयबाबू चोरडिया यांनी व्यक्त केला आहे.
अशा समाजसेवकाची समाजाला गरज…!
2024 हे निवडणुकांचे वर्ष ठरू पाहत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता अगदी तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वांनाच बघायला मिळणार आहे. सत्तेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न सुटतात, मात्र त्यासाठी जनसामान्यांच्या प्रश्नांची जान असलेला माणूस सत्तेच्या त्या दालनात जायला हवा. हाच नेमका दुवा पकडत, गेल्या तीन दशकापासून सतत आणि सातत्याने सामान्य, कष्टकरी, शेतकरी, दीनदुबळ्या गरजवंत माणसांच्या साठी सातत्याने झटत असलेले समाजसेवी विजयबाबू चोरडिया यांच्यासारख्या जनप्रतिनिधींची नेमकी समाजाला गरज असल्याचे जनमानसात बोलले जात आहे.
“हेची दान देगा देवा,
तुझा विसर न व्हावा”
विद्वान, शास्त्री, पंडितांनी सांगितले आहे, शक्यतो कुणापाशी काही मागू नये.अगदीच इलाज नसेल, तर तितकेच मागावे ज्याची तुम्ही परतफेड करू शकाल. म्हणूनचं
“हेची दान देगा देवा-तुझा विसर न व्हावा” हाचं संतांनी दिलेला उपदेश ध्यानी ठेवत आणी कदाचित हाच विश्वास ऊराशी जपत, समाजसेवी विजयबाबू चोरडिया यांच्याकडून समाजसेवेची मिळालेली भेट घेऊन निघालेला गाव खेड्यातील दिन-दुबळा सामान्य गरजवंत माणूस, हाचं ज्ञानबोध ध्यानी ठेवेल आणि कदाचित…
हाचं,
नव्या बदलाचा आरंभ असेल…!