पक्ष संघटना मजबुतीवर काँग्रेसचा भर – संजय खाडे


उद्योगपती आणी धनिकांचं भलं पाहू इच्छिणाऱ्या केंद्र सरकारच्या, कष्टकरी शेतकरी विरोधी धोरणामुळे नागावल्या गेलेला जनसामान्य माणूस आता आपल्या हक्काच राजकीय संघटन म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे बघतो आहे. याचाच परिणाम दिल्लीपासून तर गावखड्यापर्यंतच्या गल्ली-गल्लीपर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांची गर्दी आता दिवसागणिक वाढतांना दिसते आहे. असाच एक पक्षप्रवेश सोहळा नुकताच पार पडला, चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेसच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या वणी येथील निवासस्थानी.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा, एनडीए-महायुतीचे उमेदवार राज्याचे मंत्री आणि पक्षात वजन ठेवून असलेले नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना लोकसभा मतदार संघाच्या संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील जनतेने चारी मुंड्या चित करीत इंडिया आघाडीच्या, काँग्रेसच्या प्रतिभाताई धानोरकर यांचा ऐतिहासिक मताने विजयोत्सव साजरा केला. आणि तेव्हापासूनच शहरापासून तर गाव खेड्यातील जनतेचा काँग्रेस पक्षातील पक्षप्रवेशाचा ओघ सातत्याने वाढतो आहे.

भाजपने सर्वसामान्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केले. शेतक-यांच्या समस्या सुटण्याऐवजी उलट वाढत आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेवून, वणी विधानसभा क्षेत्रातील
तरोडा या गावाच्या शेकडो लोकांनी खा. प्रतिभाताई धानोरकर यांच्या वणी येथील निवासस्थानी मान्यवरांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करीत असतानाच, पक्षाला अधिक मजबूत करू अशी ग्वाही उपस्थित कार्यकर्त्यांनी दिली. यावेळी खा. प्रतिभाताई धानोरकर यांनी तरोडा येथील सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. व काँग्रेस हाच सर्वांना सोबत घेऊन जाऊ शकतो. सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळवून देऊ शकतो. हा विश्वास दृढ होत आहे. त्यामुळे लोकांचा काँग्रेसकडे ओढा वाढत आहे, असे मनोगत खा. प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले.

पक्षप्रवेश सोहळ्याचे वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड.देविदास काळे, पुरुषोत्तम आवारी, प्रा. शंकर व-हाटे, तेजराज बोढे, अनिल देरकर, प्रमोद वासेकर, टिकाराम कोंगरे, उत्तमराव गेडाम, जयसिंग गोहोकार, संध्या बोबडे, अनिल भोयर, मडावी, नंदेश्वर आसुटकर, रवि कोटावार यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष अधिक जास्त जोमाने पक्ष मजबुतीकडे लक्ष देत असून अगदी तोंडावर आलेली विधानसभा निवडणूक बघता झाडून सर्वच नेते कामाला लागल्याने, गाव खेड्यातील कार्यकर्त्यामध्ये देखील उत्साह संचारला आहे.


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment