गौरव सोहळा… समाजातील कर्तुत्ववान व्यक्तींचा गुणगौरव सोहळा भविष्यातील ठेवी म्हणून संपन्न झाला पाहिजे: प्रवीण रोगे


समाजकार्यातील अनुभव व्यक्त करीत समाजातील कर्तुत्ववान व्यक्तींचा गुणगौरव सत्कार भविष्यातील ठेवी म्हणून संपन्न झाला पाहिजे, त्याशिवाय समाजातील युवा पिढीसमोर आदर्श निर्माण होणे व सामाजिक कार्याची ओळख लागणे शक्य नाही असे मत, महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हा यवतमाळ यांच्यातर्फे 4 जून रोजी वणी तालुक्यातील रासा येथे आयोजित समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार गुणगौरव सोहळयाप्रसंगी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण रोगे यांनी व्यक्त केले. जगाच्या पाठीवर अशक्य काहीही नाही, प्रयत्न करणाऱ्यांना अपयश कधीच येत नाही, तसेच मानव जन्माचे ऋण फेडण्यासाठी समाजातील रंजल्या गांजल्या ची मदत सेवा केली पाहिजे आणि राष्ट्रसंतांचा व थोर पुरुषांचा वारसा खऱ्या अर्थाने जोपासला पाहिजे त्याशिवाय मानव जातीचे कल्याण होने शक्य नाही म्हणून प्रत्येक व्यक्तींनी आपले जीवनात काही वेळ समाजकार्यात अवश्य दिला पाहिजे हाच खरा मानव धर्म आहे असेही विचार व्यक्त करीत असतानाच उपस्थित युवकांना आपल्या अभ्यास पूर्ण प्रोत्साहित करणाऱ्या उदबोधनातून केले सदर कार्यक्रम मौजा रासा येथील शेतीच्या खुल्या आकाश मंडपात सायंकाळी 6.30 वाजता च्या सुमारास संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.श्री दत्तात्रय भाऊराव बोबडे, राज्य उपाध्यक्ष निर्भीड ग्रामीण पत्रकार संघ हे होते तर विचार मंचावर प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री डॉ. राम कात्रे एमबीबीएस एम एस सर्जन वणी तसेच मा.श्री अँड. धनंजय आसुटकर मारेगाव, मा.श्री.डाखरे साहेब वेकोली घोंसा इत्यादी मंडळींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सत्कारमूर्ती मा.श्री पांडुरंग तात्याजी कवरासे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक व सामाजिक कार्यकर्ते यवतमाळ, मा.श्री चेतन बळवंत हेपट माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्ते वणी, मा.श्री अँड. रुपेश गुणवंत ठाकरे आदर्श सरपंच व सामाजिक कार्यकर्ते मुंगोली,मा.श्री संदीप संजय गोहकार आदर्श शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते वणी इत्यादी सत्कारमूर्तींना महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हा यवतमाळ यांच्या तर्फे जिल्हास्तरीय सत्कार सोहळ्यात सन्मानपूर्वक शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करुन गौरविण्यात आले.

यावेळी संपूर्ण सत्कारमूर्तींनी आपल्या शासकीय व सामाजिक कार्याचा आढावा देत तसेच समाजकार्यातील अनुभव आणि प्रेरणा ,उत्साह व कार्यकर्तुत्वाचा मागोवा देत उपस्थित मंडळींना नवी दिशा देण्याची प्रेरणा दिली व आम्ही सामाजिक कार्य सातत्याने चालू ठेवू आणि वेळप्रसंगी कोणाला काही अडचणी आल्यास आम्हाला निश्चितपणे हाक मारा आम्ही समाजकार्यासाठी धावून येऊ अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ताजी बोबडे यांनी सत्कारमूर्तींना उद्देशून प्रकाशाची वाट दाखवणारी चिंगारी आजच्या सत्कारमूर्ती व्यक्तिंमध्ये जागृत असून बहुजन समाजाला आपल्यासारख्या प्रेरणादायी लोकांची आज अत्यंत महत्वाची गरज आहे आणि आपल्यासारख्या व्यक्तींच्या संघर्षातील प्रयत्नानेच उद्याची अंधारी रात्र ही सोनेरी पहाट होऊन निघाल्याशिवाय राहणार नाही. देशाच्या परिवर्तनासाठी आपण सत्कारमूर्ती हे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपलीच तेव्हा ओळख राहील, असे प्रोत्साहन देऊन उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नितीन तुरंनकर यांनी केले तर सूत्रसंचालन मा. ऍड रितेश बल्की, निवली यांनी केले. कार्यक्रमाचा शेवट स्नेहभोजन करून करण्यात आला. याप्रसंगी परिसरातील शेकडो नागरिक तसेच वकील, डॉक्टर, शिक्षक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment