महिला व बहीण भावाच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे उद्गार मागे घ्या – माकपची मागणी
●वणी येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर अनोख्या पत्रकार परिषदेतून केला निषेध. ●भाजपा उमेदवार मुनगंटीवार यांच्या त्या वक्तव्याचा सर्वत्र जाहीर निषेध. ●मारेगाव,वणी मध्ये काँग्रेस महिला आघाडी कडून मुनगंटीवार यांचे विरोधात पोलिसात तक्रार दाखल. |
वणी : राजू निमसटकर
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव देशात सुरू असून वाढत्या तापमानाच्या पाऱ्या बरोबरच लोकसभा निवडणुकीचे रणांगणही तेवढ्याच दमाने तापायला लागले आहे. हे कमी की काय म्हणून 8 एप्रिल 2024 रोजी देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या चंद्रपूर येथील प्रचार सभेच्या मंचावरून चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तथा महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी बहिण-भावाच्या पवित्र नात्याला बदनाम करणारे उद्गार काढून बहिण भावाच्या व महिलांच्या पवित्र नात्याला अपमानित केले आहे. मा. मुनगंटीवार यांच्या त्या वक्तव्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून जाहीर निषेध केला जात असून, बहिण भावाच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे उद्गार मा. सुधीर मुनगंटीवार यांनी मागे घ्यावे अशी जोरदार मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित केलेल्या अनोख्या पत्रकार परिषदेतून केली आहे.
अठराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे माध्यमातून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव सध्या देशामध्ये होऊ घातलेला आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षाच्या सभा होताना आपण पाहतो देखील आहोत. परंतु एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन केवळ मताचा जोगवा मागण्याकरिता अशा रीतीने अगदी खालची पातळी गाठून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी, ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा लाभलेला आहे त्या महाराष्ट्रात बहीण भाऊ आणि महिलांना कलंकित करणारे असे उद्गार सांस्कृतिक मंत्र्याकडून जाहीरपणे करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. असा घणाघाती आरोप माकपचे वतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून केला आहे. 1984 मध्ये घडलेल्या दंगलीचे समर्थन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करीत नाही. परंतु त्या दंगलीचा आधार घेऊन मतदारांमध्ये व जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे, सामाजिक स्वास्थ बिघडवणे अपेक्षित नाही. कपडे काढून बहीण भावाला एकाच खाटेवर झोपविले या विधानाचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचेवतीने जाहीर तीव्र निषेध केल्या गेला असून असे विधान करणे म्हणजे बहिण भावाच्या पवित्र नात्याला अपमानित करणे असेच होय, अशी खंत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून व्यक्त करण्यात आली आहे.
केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या काळामध्ये महिलांवरील अत्याचार सतत वाढत आहे. मनिपुर येथील महिलांना नग्न करून त्यांची दिंड काढल्या गेली, त्यावर भाजप एक शब्द बोलली नाही. एन सी आर बी नुसार 2014 मध्ये दर तासाला महिला विरुद्ध सुमारे 37 गुन्हे घडले होते. परंतु 2021 पर्यंत ही संख्या 49 वर गेली. म्हणजेच, या गुन्ह्यात 30 टक्याहून अधिक वाढ भाजपच्या काळात झाली आहे. 2021 पर्यंत दैनंदिन बलात्काराची संख्या दररोज सरासरी 90 पेक्षा जास्त होती. 2014 मध्ये अनुसूचित जमातीच्या मुलीवर होणाऱ्या बलात्काराची संख्या दर दिवशी 2.5 वरून 2021 मध्ये दर दिवशी 4 बलात्कारावर पोहचली. अनुसूचित जातीच्या मुलीवर होणाऱ्या दैनंदिन बलात्काराची संख्या याच कालावधीत 11 वर गेली. 2017 ते 22 अशी सलग सहा वर्ष महिलाविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये भाजपाचे सरकार असलेलं उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर आहे. 2019 ते 2022 पर्यंत महिला विरुद्ध च्या गुन्ह्यामध्ये राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 2023 मध्ये महाराष्ट्राने राजस्थानला मागे टाकून दुसरे स्थान मिळवलेले आहे. एन सी आर बी च्या आकडेवारीनुसार 2017 पासून मुलावरील लैंगिक गुन्ह्यांमध्ये 94.47% वाढ नोंदवली गेली आहे. उत्तर प्रदेश मध्ये 2022 मध्ये नोंदविलेल्या एकूण 63,414 प्रकरणापैकी लैंगिक गुन्ह्याच्या 8,136 सर्वाधिक गुन्ह्याची नोंद झाली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आणि माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार हे या विषयावर का बोलत नाही हाच खरा प्रश्न आहे.
प्रतिष्ठेपायी होणाऱ्या गुन्ह्याविरुद्ध कायदा करण्याची मागणी लावून धरली असताना असा कायदा करण्यासाठी भाजप सरकारने नकार दिला आहे. प्रतिष्ठेपायी होणाऱ्या गुन्ह्याच्या विरुद्ध आणि महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचा कायदा करण्यासाठी भाजपच्या सरकारने कोणतेही सौजन्य दाखविलेले नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर महिला सक्षमीकरणाच्या बाता करीत आहे. असा घणाघाती आरोप करीत “आधी कायदा करा आणि नंतर बाता करा” हीच भूमिका माकप ची राहिलेली आहे. असेही दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून माकप च्या वतीने गंभीर आरोप केले आहे.बहिण भावाच्या पवित्र नात्याच्या बद्दल माननीय मुनगंटीवार यांनी काढलेल्या “त्या” उद्गाराचा जाहीर निषेध करण्याकरिता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन त्या विधानाचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. यावेळी कॉम्रेड कुमार मोहरमपुरी. ऍड काँ. दिलीप परचाके, कॉ.मनोज काळे, कॉ.नंदू बोबडे, कॉ. गजानन टाकसांडे, व अनेक कम्युनिस्ट कार्यकर्ते उपस्थित होते.
एन सी आर बी नुसार 2014 मध्ये दर तासाला महिला विरुद्ध सुमारे 37 गुन्हे घडले होते. परंतु 2021 पर्यंत ही संख्या 49 वर गेली. म्हणजेच, या गुन्ह्यात 30 टक्याहून अधिक वाढ भाजपच्या काळात झाली आहे. 2021 पर्यंत दैनंदिन बलात्काराची संख्या दररोज सरासरी 90 पेक्षा जास्त होती. 2014 मध्ये अनुसूचित जमातीच्या मुलीवर होणाऱ्या बलात्काराची संख्या दर दिवशी 2.5 वरून 2021 मध्ये दर दिवशी 4 बलात्कारावर पोहचली. अनुसूचित जातीच्या मुलीवर होणाऱ्या दैनंदिन बलात्काराची संख्या याच कालावधीत 11 वर गेली. 2017 ते 22 अशी सलग सहा वर्ष महिलाविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये भाजपाचे सरकार असलेलं उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर आहे. 2019 ते 2022 पर्यंत महिला विरुद्ध च्या गुन्ह्यामध्ये राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 2023 मध्ये महाराष्ट्राने राजस्थानला मागे टाकून दुसरे स्थान मिळवलेले आहे. एन सी आर बी च्या आकडेवारीनुसार 2017 पासून मुलावरील लैंगिक गुन्ह्यांमध्ये 94.47% वाढ नोंदवली गेली आहे. उत्तर प्रदेश मध्ये 2022 मध्ये नोंदविलेल्या एकूण 63,414 प्रकरणापैकी लैंगिक गुन्ह्याच्या 8,136 सर्वाधिक गुन्ह्याची नोंद झाली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आणि माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार हे या विषयावर का बोलत नाही हाच खरा प्रश्न आहे. असा प्रश्न माकपचे वतीने प्रशिद्ध केलेल्या पत्रकातून करण्यात आलेला आहे. |