जन चळवळीचा रेटा, काँग्रेसच्या पथ्यावर…?


“एक अकेला थक जाये तो मिलकर बोझ उठाना,साथी हात बढाना” म्हणत, उभी राहू पाहते आहे जनचळवळ…!

एकीकडे आपलाच गेरु आणि आपलाच चुना सोबतीला घेत, “एक अकेला थक जाये गा मिलकर बोझ उठाना, साथी हात बढाना” म्हणत, गाव खेड्यापासून तर झोपडीतल्या वस्तीपर्यंत हाताला साथ देत जनचळवळीचा रेटा लोकशाहीच्या उत्सवाची लढाई लढायला सज्ज झाला असल्याचे दिसते आहे. तर दुसरीकडे स्व:रक्षणाचा शिलेदार होऊ पाहात असलेला गाव खेड्यातला सामान्य कार्यकर्ता जन चळवळीचा केंद्रबिंदू असल्याने, हा जनचळवळीचा रेटा काँग्रेसच्या पथ्यावर पडेल का ? असेच काहीसे चित्र चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील गाव खेड्यातल्या वस्ती वस्तीतील सामान्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत असलेल्या बैठकातून बघावयास मिळते आहे.

मागील लोकसभा निवडणुकीचा इतिहास बघता, मोदी लाटेतही दिवंगत माजी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे माध्यमातून एक हाती किल्ला लढवत यशस्वी झालेल्या याचं लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा, विकास पुरुषाच्या पोकळ वल्गनांचा विरोध करण्याबरोबरच देश पातळीवरील हुकूमशाहीचा विरोध आणि संविधान वाचवा म्हणत, जन चळवळीचा रेटा गावागावात उभा राहतो आहे. परिणाम स्वरूप गाव वस्ती पासून तर शहरा शहरातल्या झोपडपट्टीपर्यंत काँग्रेसच्या प्रतिभाताई धानोरकर यांचाच डंका सध्या तरी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात बघावयास मिळतो आहे.

जातीयतेच्या सीमा ओलांडून, पक्षा-पक्षातील विसंवादी विचाराला मूठ माती देत, गटातटाचे राजकारण बाजूला सारत,
“आपलाच गेरु आणि आपलाच चुना, हाताला साथ देत लढायला सज्ज व्हा” असे म्हणत, स्वाभिमानी बाणा उराशी जपत, गाव खेड्यातला सामान्य कार्यकर्ता तन-मन-धनाने स्वखर्चाने लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात, सामान्यांच्या न्याय हक्काबरोबरच स्व:रक्षणाच्या लढाईचा शिलेदार होऊ पाहतो आहे. हाच शिलेदार जनचळवळीच्या माध्यमातून गावा-गावात सायकलने, मोटार सायकल ने प्रसंगी पायदळ वारी करीत देखील प्रचंड मेहनत घेतानाही दिसतो आहे. ही जनचळवळीची मोहीम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने गांभीर्याने घेतली असून लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी व इंडिया आघाडीला निवडून आणन्यासाठी प्रचार अभियान राबवित आहेत. त्या अनुषंगाने चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात इंडिया आघाडीच्या म्हणजेच काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन देखील माकपचे जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी, किसान सभेचे राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ.ॲड. दिलीप परचाके व किसान सभेचे नेते कॉ. मनोज काळे यांचे नेतृत्वात केल्या जात आहे. चावडी-पोडापासुन तर तांडा वस्ती पर्यंत आणि गाव खेड्या पासून तर शहरा शहरातल्या झोपडपट्टीपर्यंत ही जनचळवळ मतदार राजाला बोलते करीत जन चळवळीचा रेटा अधिक तीव्र करताना दिसते आहे.

केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने देशातील जवळपास सर्वच सरकारी संस्थांचा असंवैधानिक पद्धतीने वापर करून देशातील जनतेवर अघोषित आणीबाणी लादली. साम-दाम-दंड-भेदाने विरोधकांना जेरीस आणून हुकूमशाही पद्धतीने देश चालवीला जात आहे. हा प्रकार लोकशाही संपवून शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, युवक व विद्यार्थ्यांचे अधिकार नष्ट करीत त्यांना गुलामीत टाकण्याची प्रथा निर्माण करणारा आहे. बुद्धिभेद करून तर्क शक्ती नष्ट करून अंधभक्तांची फौज तयार केली जात असून जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला जात आहे. असा आरोप जनसामान्यांच्या न्याय हक्काची लढाई लढू पाहत असलेल्या याच जन चळवळीच्या माध्यमातून केला जात आहे. येणाऱ्या काळात सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता व संघीय रचना देणारे भारतीय संविधान बदलविण्यासाठी, जनता विरोधी शक्तीच्या माध्यमातून देशात ४०० पार ची घोषणा दिल्या गेली आहे. हे सर्व भाजपचे जनविरोधी, देशविरोधी, लोकशाही व संविधान विरोधी षडयंत्र समजून घेऊन जनतेने भाजपचा डाव उधळून लावावा व आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणावे असे आवाहन याच जन चळवळीच्या माध्यमातून केले जात आहे. गाव वस्ती पासून तर चावडी पोडावरील बैठकांचे मोहिमेतून हा जन चळवळीचा रेटा दिवसागणिक अधिक तीव्र होताना दिसतो आहे. या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ.कुमार मोहरमपुरी, ॲड.कॉ.दिलीप परचाके, कॉ.मनोज काळे, कॉ.चंद्रशेखर सिडाम, कॉ. कवडु चांदेकर, कॉ.गजानन ताकसांडे, कॉ.शंकर गाऊत्रे, कॉ.सुधाकर सोनटक्के, कॉ.रामभाऊ जीद्देवार, कॉ.किसन मोहूरले, कॉ.संजय वालकोंडे, कॉ.संजय कोडापे, कॉ.वसंता नागोसे, कॉ.अमोल चटप आदींनी केले आहे.


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment