नाही रे बाप्पा…
आम्हाला ” वसंत ” ची ” सूतगिरणी ” होऊ द्यायची नाही…
वणी : राजू निमसटकर
वसंत जिनिंगचा निवडणुक प्रचार जसजसा अंतिम टप्प्यात पोहोचतो आहे, तसतशी प्रचाराची रणधुमाळी देखील वणी विधानसभा मतदार संघातल्या गावागावात बघावयास मिळते आहे. मात्र, याच प्रचाराच्या रणधुमाळीत… नाही रे बाप्पा… आम्हाला “वसंत” ची “सूतगिरणी” होऊ द्यायची नाही… असा सूरही सुज्ञ मतदार राजाकडून ऐकावयास येतो आहे.
दि वसंत को-ऑपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी लिमिटेड वणीच्या निर्मणापासून आज पर्यंत अनेक निवडणुका होऊन गेल्यात. मात्र, झालेल्या संचालकाचे निवडणुकीपैकी कधी नव्हे अशी चुरस होऊ घातलेल्या निवडणुकीत बघावयास मिळते आहे.
खरे म्हणजे सहकार क्षेत्र हे सेवेचे क्षेत्र आहे, अशी धारणा असलेल्या या क्षेत्राला, आता राजकारण्यांनी पुरता राजकारणाचा अड्डा बनवून टाकला आहे. म्हणूनच निवडणुकीच्या मैदानात जनतेच्या सेवेची भाषा अपवाद सोडला तर कुठेच दिसत नाही. आणी जे काही दिसते आहे ते केवळ आणी केवळ आरोप प्रत्यारोपाच्या फैरीच. या आरोप प्रत्यारोपाला सुज्ञ मतदार चांगलाच ओळखून आहे. आणि म्हणूनच, नाही रे बाप्पा… आम्हाला “वसंत” ची “सूतगिरणी” होऊ द्यायची नाही… असा सूर सुज्ञ मतदार राजाकडून ऐकावयास येतो आहे.
बदलत्या परिस्थितीचा एकूणच विचार करता, आरोप प्रत्यारोप करणाऱ्या नेतृत्वाला वसंत चा मतदार राजा चांगलाच धडा शिकवेल यात शंका नाही. म्हणूनच वसंत जिनिंगला चांगले दिवस आणणाऱ्या “जय सहकार” पॅनलच्या नेतृत्वांकडे मतदारांचा कल बघायवास मिळतो आहे… तब्बल दहा वर्ष वसंत जिनिंगचा एक हाती कारभार चालवणारे, सहकार क्षेत्राची जाण असलेले एड. देविदास काळे, समाजसेवी विजयबाबूू चोरडिया, शिवसेनेचे संजय देरकर यांचे नेतृत्वातील “जय सहकार” पॅनल मतदारांच्या पहिल्या पसंतीत उतरल्याचे निवडणूक प्रचाराचे अंतिम टप्प्यापर्यंत दिसते आहे…
हजारो बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल, बळीराजा शेतकऱ्यांच्या जीवनात सुखाचे दिवस येईल हा खोटा आशावाद दाखवत, नव्वदच्या दशकात इंदिरा सहकारी सूतगिरणीचे निर्माण झाले. भागधारकाचे नावावर बळीराजा शेतकऱ्यांकडुनच लाखो रुपयांची रक्कम गोळा झाली. शासनाचा करोडो रुपयाचा निधी आला. दिसायला केवळ लोखंडाचे खंडार बांधकाम उभे झाले. मात्र, आजतागायत सुताचा एकही धागा सूतगिरणीतून निघाला नाही, ना बळीराजाच्या जीवनात सुखाचे दिवस आले… ही अवस्था आम्हाला वसंतची होऊ द्यायचे नाही. असा सूर वसंतच्या सुज्ञ मतदार राजाकडुन ऐकावयास येतो आहे…