सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि विकासाची दिशा ठरविणारे जय सहकार पॅनलचे दिग्गज नेतृत्वच मतदारांच्या पहिल्या पसंतीत…
वणी : राजू निमसटकर
सहकार क्षेत्रात नावाजलेल्या “दि वसंत” च्या सार्वत्रिक निवडणुकीचा भोंगा वाजला आणि खडबडून जागा झालेला राजकारणी एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभा ठाकला. तोही, तब्बल चार परस्पर विरोधी तगड्या पॅनलसह कोट्यावधीच्या घरात उलाढाल असलेल्या संस्थेचा वसंत फुलवायला. ही निवडणूक जरी, सहकार क्षेत्रातल्या दि वसंत को-ऑपरेटिव्ह जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी लिमिटेड वणीची मर्यादित निवडणूक असली तरीही, या निवडणुकीत वणी विधानसभा क्षेत्रातील सर्वच दिग्गज राजकारणी कामाला लागल्याचे चित्र अगदी स्पष्ट झाले आहे.
भारतीय स्वातंत्र्यानंतर भारताने स्वीकारलेल्या लोकशाहीत जनता ही मुख्य केंद्रबिंदू समजून तत्कालीन केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारनी जनताभिमुख धोरणे राबवायला सुरुवात केली होती. याच जनताभिमुख धोरणातून सहकार क्षेत्राचे निर्माण झाले आणि वणीच्या पुरोगामी भूमीतही “दि वसंत को-ऑपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी लिमिटेड” च्या नावाने पहिल्यांदाच सहकार क्षेत्राची मुहूर्तमेळ रोवल्या गेली. आता या रोपट्याचा वटवृक्ष झालाय, आणि राजकारण्यांसाठी तो “राजकारणातील आखाडा” बनलाय.
विभागातील सहकार क्षेत्राचा तसा एकूणच विचार केला तर, सहकार क्षेत्रावर तशी काँग्रेस पक्षाचीच पकड मजबूत होती. मात्र यावेळच्या सहकार क्षेत्रातल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आणी दिग्गज राजकारणी एकमेकांसमोर परस्पर विरोधी पॅनलच्या रूपाने उभे टाकलेत. केंद्रात आणि राज्यात असलेल्या भाजपाने ही निवडणुकीत संपूर्ण ताकद पणाला लावत उडी घेतली, मात्र इथेही पक्षांतर्गत फुटीने ढगफुटीच केली. तर लहान मोठ्या राजकीय पक्षांना एकत्रित करीत भाकपाने ही सहकार क्षेत्र गाजवायचे ठरवले.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर, अकरा हजाराचे घरात असलेल्या वसंत च्या मतदारांसह वणी विधानसभा मतदार क्षेत्रातील मतदार आणि मतदार मात्र चांगलेच लक्ष ठेवून आहे. सहकार क्षेत्र वाचले तरच सर्वहारा वर्गासह जगाचा पोशिंदा बळीराजा हा देखील तग धरेल, जगेल अशी सर्वांचीच धारणा आहे. म्हणूनच सहकार क्षेत्र वाचविण्यासाठी त्या विचाराला आणि सहकाराला विकासाच्या दृष्टीने पुढे नेणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. हे वास्तव जनमानस ओळखून आहेच.
सहकारचा होईल ” जय सहकार…”
” होऊ घातलेल्या वसंत जिनिंगच्या निवडणुकीत सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि विकासाची दिशा ठरविणारेच मतदारांच्या पहिल्या पसंतीत उतरणारे असणार आहेत. अशी सार्वत्रिक चर्चा संपूर्ण मतदारसंघातील मतदार राजा बोलून दाखवतो आहे. याचाच अर्थ…सहकार चा “जय सहकार” होईल यात शंका नाही. “
( क्रमशः भाग पुढील बातमीत… )